Tag Archives: congress

महाराष्ट्र प्रदेशची काँग्रेसची कार्यकारणी आणि १४ जिल्हा व ग्रामीणचे अध्यक्ष अखेर जाहीर १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, ६ प्रवक्ते कायम

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसची कार्यकारणीत कोणा कोणाचा समावेश होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यानुसार आज काँग्रेसच्या केंद्रीय समितीने महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेस कार्यकारणीतील नावांना मंजूरी दिली असून यासंबधीची यादीही जाहीर केली. या कार्यकारणीत १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, १०४ सचिव, १ खजिनदार आदींसह कार्यकारणी सदस्य आणि १४ …

Read More »

नर्सिंगच्या या अभ्यासक्रमांना आता थेट मिळणार प्रवेश: सीईटी परिक्षेची गरज नाही एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही—वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी एएनएम (ऑक्सिलरी  नर्सिंग मिडवाइफरी) म्हणजेच सहायक नर्सिंग मिडवाइफरी आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी थेट १२ वीच्या गुणांवर प्रवेश देण्यात येणार असून सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक मंत्रालयात …

Read More »

बैलगाडी शर्यतींबाबत महिनाभरात मार्ग काढणार पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील बैलगाडी शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडी शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धीने संगोपन केले जाते. या करीता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिन्याभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन …

Read More »

हिंदूंच्या प्रेतांची गंगा नदीत अवहेलना करणाऱ्यांना हिंदूचे नाव घेण्याचा अधिकार नाही ‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’, अभियान नांदेडमध्ये संपन्न

नांदेड: प्रतिनिधी देशाला मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून ते मोठ्या कष्टाने मिळाले आहे, अनेकांनी त्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्यचळवळीत काँग्रेस पक्षाचा मोठा सहभाग राहिला आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवणारे राज्य असून स्वातंत्र्य चळवळीतही ‘भारत छोडो’सह अनेक महत्वाच्या आंदोलनाची पायाभरणी महाराष्ट्रात झाली. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राने मोठे योगदान दिले …

Read More »

काँग्रेस पदाधिकाऱ्यानेच केली मंत्री केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फीची मागणी काँग्रेस संसदीय समितीचे सदस्य डॉ.आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर- मुंबई: प्रतिनिधी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अन्य तीन बँकांना ८०० कोटी रूपयांचा चुना लावला आहे. विशेष म्हणजे स्वत:चे निर्दोषत्व सिध्द करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलच्या अध्यक्षालाच सरकारी वकील म्हणून नियुक्त करून स्वत:चा बचाव करत असून सदरचा सरकारी वकील बदलावा आणि पदुम …

Read More »

राहुल गांधींबद्दल रावसाहेब दानवेंची भाषा कुसंस्कृतपणा दर्शवणारी महागाई, बेरोज़गारी, ग़रीबी, जीडीपी, अर्थव्यवस्थेवर काय दिवे लावले ते सांगा ? -नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मोदी सरकारमधील राज्यातील मंत्री जनआशिर्वाद यात्रेच्या नावाखाली विरोधी पक्षांना फक्त शिव्या देण्याचे काम करत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर येऊन टीका करणे हाच भारतीय जनता पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेली भाषा त्यांचा कुसंस्कृतपणा दाखवतो असे प्रत्युत्तर देत मोदी सरकारने ७ …

Read More »

दानवेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींना दिली या प्राण्याची उपमा देवाला सोडलेला वळू म्हणाल्याने राजकारणात उमटले पडसाद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वादग्रस्त भाजपा नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्यास सुरुवात झाली. जन आर्शिवाद यात्रा बदनापूर येथे पोहोचली असता त्यांनी काँग्रेसचे माझी अध्यक्ष तथा नेते राहुल गांधी म्हणजे देवाला सोडलेला वळू म्हणत नवा राजकिय वाद निर्माण केला …

Read More »

रायगड जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कल्याणकर रायगडचे जिल्हाधिकारी तर वारभुवन आदिवासी विभागात

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने आज पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेल्या आहेत. ज्या आयएएस अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत चांगले काम करूनही रायगडच्या जिल्हाधिकारी यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना आयटी विभागाच्या संचालक पदावर नियुक्त …

Read More »

भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराचे केंद्र महागाई, इंधन दरवाढीचे खापर काँग्रेसवर फोडून भाजपाकडून जनतेची दिशाभूल-नाना पटोले

पुणे: प्रतिनिधी पुणे, पिंपरी चिंचवड असो वा दिल्ली भारतीय जनता पक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भाजपाने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून आरोप मात्र ते दुसऱ्यांवर करत आहेत. त्यांच्याच आशिर्वादाने स्वीस बँकेतील भारतीयांचा काळा पैसाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टचारी वृत्तीमुळेच देश रसातळाला गेला असून भाजपा हा …

Read More »

ज्या स्व. बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्याच चिंरजीवांनी सत्तेसाठी गुडघे टेकले भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या भाजपा विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून आपण सत्तेसाठी किती अगतिक आहोत हेच दाखवून दिले असून काँग्रेसपुढे गुडघे टेकून महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्या शिवसेनेने राज्याच्या विकासाला वेठीस धरू नये, अशी टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी …

Read More »