मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनलॉक जाहिर करण्यावरून काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेली परस्पर वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार व मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात केवळ वेळेचा अभाव झाला आहे. समन्वयाचा अभाव आहे असे नाही आणि त्यातील मला अधिक माहिती नाही असे सांगतानाच वडेट्टीवार यांना अडव्हॉन्स माहिती …
Read More »म्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंजूरी दिली. दरनिश्चीती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता …
Read More »अखेर बारावीच्या परीक्षा रद्द ! मंत्री वडेट्टीवारांची अर्धी घोषणा उतरली सत्यात शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडून अधिकृत घोषणा
मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा करत १२ वीची परिक्षाही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे अनलॉकबाबत वडेट्टीवारांना युटर्न घ्यावा लागला. परंतु त्यांनी केलेली १२ वीची परिक्षा रद्दची घोषणा अधिकृतरित्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी …
Read More »वडेट्टीवारांचे “अनलॉक” तर सीएमओचे “प्रस्ताव विचाराधीन” राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन-मुख्यमंत्री कार्यालय
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२१ रोजी पासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर १ जूनपासून पॉझिटीव्हीटी दर कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यास राज्य सरकारने मान्यता देत निर्बंध कडक ठेवण्याबाबतचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्याच दोनच दिवसांचा कालावधी लोटला नाही तोच आज मदत व पुर्नवसन मंत्री …
Read More »१२ वीची परिक्षा रद्द तर राज्यात पाच टप्प्यात पूर्णत: अनलॉक निर्बंध मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी १० वी पाठोपाठ १२ वीची परिक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध पाच टप्प्यात उठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली …
Read More »महा. आघाडी सरकार देणार अनाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेत १ मार्च २०२० रोजी व त्यानंतर …
Read More »पदोन्नतीबाबत सकारात्मक निर्णय होईल, मी नाराज नाही… ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची स्पष्टोक्ती
मुंबई: प्रतिनिधी सरकारी सेवेत असलेल्या मागासवर्गीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना मिळणारे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करत आरक्षित पदेही खुल्या प्रवर्गातून भरण्याच्या निर्णया विरोधात काँग्रेसचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जाहिर भाष्य करत ७ मेचा तो शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी केलेल्या या मागणीनुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त …
Read More »कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचंय: गावं कोरोनामुक्त करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा नवा नारा
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात आलेली दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्याचे सारे श्रेय तुम्हा जनतेचे आहे. तिसरी लाट कधी येईल कोणत्या तारखेला येईल याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबत नाहीतर कोरोनावर मात करून जगायचं असल्याचा नारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. तसेच प्रत्येक गावच्या संरपंचाने …
Read More »BreakTheChain नुसार असे राहणार जिल्हानिहाय लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार
मुंबई : प्रतिनिधी ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी …
Read More »मोदींचे धोरण म्हणजे लसीसाठी पैसेवाल्यांना पंचतारांकीत सुविधा तर गरिबांसाठी रांग देशातील जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणा-या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा : नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला खोटी स्वप्ने दाखवून सत्ता मिळवली, पण सात वर्षात मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून पहिल्या लाटेत नमस्ते ट्रम्पच्या आयोजनात व्यस्त राहिले आणि परिस्थिती अंगलट येताच तबलीगीच्या नावावर कोरोनाचे खापर फोडून धार्मिक रंग देण्याचा …
Read More »
Marathi e-Batmya