भाजपा महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे २० ऑक्टोबरला राज्यभर पिठलं भाकर आंदोलन फसवे पॅकेज देऊन शेतकऱ्याची काळी दिवाळी करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार करणार

राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवले आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे आणि जे जाहीर केले तेही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. जगाचा पोशिंदा बळीराजावर काळी दिवाळी करण्याची वेळ आहे आणि या परिस्थितीला शेतकरी विरोधी महायुती सरकारच जबाबदार आहे. भाजपा महायुती सरकारचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेस पक्ष सोमवार २० ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकऱ्यांसोबत पिठलं, भाकरी व ठेचा खाऊन आंदोलन करणार आहे.

अतिवृष्टीने राज्यातील ३० जिल्ह्यातील ३५० तालुक्यात सर्व वाहून गेले आहे. लाखो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. हेक्टरी ५० हजार रुपये, जमीन खरडून गेली त्यासाठी हेक्टरी ५ लाख रुपये व कर्जमाफी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने लावून धरली होती पण भाजपा महायुती सरकारने जुन्याच योजनांची गोळाबेरीज करून ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण हे पॅकेज फसवे निघाले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देण्याचे आश्वासनही फेल गेले असून सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर पिठलं भाकर आंदोलन करणार आहे. सर्व जिल्हे, तालुका व गावागावात हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *