भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. महागाईने पिचलेल्या जनतेला इंधन दरवाढ करून मोदी सरकारने महागाईच्या खाईत लोटले आहे. भाजपा सरकारने केलेल्या या महागाई विरोधात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली दादर येथील इंडिया बुल्स समोर आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, ‘इंडियन ऑईल’च्या सीएसआरमधून बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर कूपर रूग्णालयास दिले बायोकेमिस्टी ब्लड अॅनालायझर
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) च्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत जुहू येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात पूर्णपणे स्वयंचलित अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती …
Read More »८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी
महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सुमारे ८९ हजार ७३१ कोटी रुपयांच्या पाच विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे २० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ अन्यायकारक, दरवाढ तात्काळ मागे घ्या पेट्रोल डिझेल टंचाईची झळ मुंबईतही पोहचली, खोटी व दिशाभूल करणारी विधाने करण्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंधन पुरवठ्यावर लक्ष द्यावे
महागाईने जनता त्रस्त असताना पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. मागील ११ दिवसात पेट्रोल डिझेलचे दर प्रति लिटर ८ रुपयांनी वाढले आहेत. ही इंधन दरवाढ सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करणारी असून केंद्रातील भाजपा सरकारने ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, शासकीय सेवा पुनरावलोकन करून जीपीआर प्रक्रिया कक्षेत आणाव्यात गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनीअरिंगद्वारे सर्व विभागांच्या सेवांचे पुनरावलोकन करण्याचे आदेश
शासकीय सेवा सुलभ, वेगवान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनीअरिंग – जीपीआर) प्रक्रिया राज्यात राबविण्यात येत आहे. त्या प्रक्रियेला गती देऊन शासकीय सेवा व योजनांमधील अनावश्यक टप्पे, कागदपत्रे आणि प्रक्रिया कमी करण्यावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी सर्व विभागांनी आपल्या सेवांचे पुनरावलोकन करून त्या जीपीआर प्रक्रिया कक्षेत आणाव्यात, असे निर्देश …
Read More »पालघर अपघात : मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत वितरित
पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर एकूण ६५ लाख रुपयांच्या मदतीची रक्कम जिल्हाधिकारी, पालघर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पुण्यात १० वर्षात ४०० कोटींची गुंतवणुक आणि एक हजार रोजगार निर्मिती राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार
राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यात पुढील दहा वर्षांत सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे एक हजारावर थेट रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, पेट्रोल पंप बंद, महागाई वाढली, सरकार खरं का बोलत नाही? राज्यातील यंत्रणा कुलमोडली, पुणे बनले ‘क्राईम कॅपिटल’, पेट्रोल-डिझेल दरवाढ ही फक्त सुरुवात पिक्चर अभी बाकी है
पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत काही आश्वर्य वाटत नाही. ही फक्त सुरूवात आहे, पिक्चर अभी बाकी है कशाचेही सोंग घेता येते हो पण पैसे आणि अन्नधान्याचे सोंग घेता येत नाही असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल पंप …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, मुख्यमंत्री कितीही खोट बोलत असले तरी…हेच सत्य वाशिम जिल्ह्यांत इंधन टंचाई आहे हे सत्य
मुख्यमंत्री कितीही खोटं बोलत असले, तरी महाराष्ट्रातील चित्र इंधन टंचाईची सत्य परिस्थिती सांगणारं आहे. वाशिम जिल्ह्यात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. रात्रंदिवस रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळणे अवघड झाले असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, जर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर येरवडा, ठाणे, रत्नागिरी, नागपूर येथील मानसिक रूग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर
महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करणे हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून, गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेला दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प …
Read More »
Marathi e-Batmya