सौरऊर्जा निर्मितीमध्ये जागतिकस्तरावर महत्त्वाची भूमिका असलेल्या एकात्मिक इनगॉट व वेफर उत्पादन संकुल नागपूर येथे वारी एनर्जिज माध्यमातून उभारण्यात येत आहे. भारतातील सर्वात मोठी १० गिगावॅट क्षमता असलेला हा प्रकल्प सौर क्षेत्रासाठी अधिक स्थिर देशांतर्गत पुरवठा यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सौरऊर्जा निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल भव्य राष्ट्रध्वज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्कवर भव्य राष्ट्रध्वजाचे लोकार्पण
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण ठेवून नागपुरात उभारण्यात आलेला हा भव्य राष्ट्रध्वज येथील जनतेच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तपत्र समूह …
Read More »वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखाली समिती
मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांची नियुक्ती …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय
इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला भाजपा सरकारचे चुकीचे धोरण व नाकर्तेपणामुळे झाला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला भासत आहे. इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० …
Read More »मुंबईतील विधानभवनासह महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी विधानभवन केले रिकामे, प्रशासनात खळबळ
आंतरराष्ट्रीयस्तरावर अमेरिका आणि इस्रायलने इराण देशाच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर होत आहे. त्या परिणामातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच संसदेचे आणि महाराष्ट्रात विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. मात्र या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशऩाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सगळी कडेकोट सुरक्षा असताना मुंबईतील विधानभवनासाह सार्वजनिक …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२९ पर्यंत ‘ट्रिलियन डॉलर’ची महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होणार
राज्याच्या विकासासाठी आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक वाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र देशात आर्थिकदृष्ट्या मजबूत राज्य म्हणून उभे राहत असल्याचे सांगून पुढील काही वर्षांत महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले राज्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र जगभरात एक नव्हे तर …
Read More »सुनेत्रा अजित पवार यांचे आश्वासन, आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्यस्तरीय ‘जेंडर रिसोर्स सेंटर’ स्थापन करणार
महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात महिलांचे योगदान अनन्यसाधारण आहे. आता ही शेती खऱ्या अर्थाने महिलांच्या नेतृत्वाखाली नव्या पर्वात प्रवेश करत आहे. महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आगामी अधिवेशनात विशेष विधेयक सादर करण्यात येईल. केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्यस्तरीय ‘जेंडर रिसोर्स सेंटर’ स्थापन केल्यामुळे महिलांचे कृषी प्रश्न सोडविण्यास …
Read More »सोशल मीडियावरील बदनामीला आळा घालण्यासाठी पोलिस डीजीच्या अध्यक्षतेखाली समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत आश्वासन
सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची होणारी बदनामी आणि सायबर छळवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नउत्तरांच्या तासात सांगितले. विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील सायबर सुरक्षेबाबत प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …
Read More »७.५ एचपी वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही केवळ ७.५ हॉर्सपॉवरपर्यंत वीज वापर करणाऱ्यांसाठी लागू आहे. शेतकरी ग्राहकांनी आवश्यक उपाययोजना करून वीज वापर ७.५ हॉर्सपॉवरच्या आत आणल्यास त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कृषी पंपधारक शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेपासून …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, विकासाकडे जाताना महाराष्ट्राचे वास्तव काय? ५.५० लाख कोटींवर असलेले कर्ज आता ११ लाख कोटींवर पोहोचले
अर्थसंकल्पावर चर्चा होत असताना अर्थमंत्री इथे बसले पाहिजे. मी तासंतास चर्चेमध्ये बसायचो. अधिकारी या सरकारला जुमानत नाहीत, मुख्यमंत्री हे का चालवून घेतात याचा तपास करायला पाहिजे. या वर्षीचा अर्थसंकल्प एकदम उत्तम दिवशी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार असलेल्या जयंतीदिनी मांडला गेला पण पण त्याहून देखील महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण अर्थसंकल्पीय …
Read More »
Marathi e-Batmya