Tag Archives: eknath shinde

मुंबई महानगरातील ‘या’ रस्ते प्रकल्पांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा - मुख्यमंत्री

मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. जनतेला तात्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

दिपक केसरकर यांचे प्रत्युत्तर, तुमच्यासाठी काहीतरी केले, तेही सांगा; अन्यथा मी जाहीर करेन शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे याना इशारा

तुम्ही माझ्या नातवाच्या अॅडमिशनसाठी प्रयत्न केलेत, पण त्याही पेक्षा जास्त मी तुमच्याकरीता काही तरी केलेले आहे. माझ्याही हातून मोठ मोठी कामे झाली आहेत. ते ही लोकांना सांगा. अन्यथा येत्या दोन दिवसात मी प्रसार माध्यमांसमोर मी जे जे काही तुमच्यासाठी केले ते सगळे जाहीर करेन असा सज्जड इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते …

Read More »

अजित पवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावर आम्ही दोघेही बघतोय… शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपये आणि जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना भरीव मदत करावी

एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्हयातील …

Read More »

औरंगाबाद नामांतराचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय उच्च न्यायालयात एक ऑगस्टला होणार उच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या अखेरच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात सत्तांतर होत बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने उध्दव ठाकरेंच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देत त्यासंदर्भातील निर्णय नव्याने घेत तो राज्य …

Read More »

आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा अचानक रद्द कारण अद्याप अस्पष्ट

शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. आज सायंकाळी सात वाजता ते पुन्हा एकदा दिल्लीकडे रवाना होणार होते. आणि रात्री ९ वाजता ते महाराष्ट्र सदन येथे पोहोचणार होते. मात्र त्यांचे दिल्लीसाठी विमानाने उड्डाण होण्या अगोदरच त्यांचा दिल्ली दौरा रद्द …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पोलिसांच्या घरांसाठी शॉर्ट, मिडीयम आणि लॉंग टर्म… पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा

पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्वं विभागानी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पोलिस गृहनिर्माण या विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा दम, विधानसभेच्या निवडणुका होऊ द्या, मग दाखवतो शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होणार

उद्धव ठाकरे यांनी ‘दैनिक सामना’ला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता थेट टीका केली आहे. प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वतःला नरेंद्र मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. त्यामुळे भाजपवाल्यांनो सावधान, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. विधानसभेच्या निवडणुका होऊ द्या, मग दाखवतो, असे आव्हानही …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारच्या आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत झाला निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या तिसऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ११ हून अधिक निर्णय घेतले. त्यातील काही निर्णय खालील प्रमाणे… ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता औरंगाबाद जिल्ह्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास ८९०.६४ कोटींच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. …

Read More »

शेतकऱ्यांना २०१७ सालापासून प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

राज्यातील शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि ६ हजार कोटी निधी लागेल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १३.८५ लाख शेतकऱ्यांच्या १४.५७ लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. ५७२२ कोटी इतका …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश; सचिवांनो, कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना भेटा विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

लोकांचे प्रश्न सोडवतांना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा असे निर्देश दिले.  मुख्यमंत्री आज मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे …

Read More »