Tag Archives: eknath shinde

अंबादास दानवे यांचा हल्लाबोल, मदत केली मग शेतकरी आत्महत्या का करतोय सरकारचं कृषीधोरण शेतकरी विरोधी

दुष्काळ, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या , शेतमालाला बाजारभाव पीक विमा आदी समस्येमुळे शेतकरी त्रस्त आहे. सरकार मोठं मोठ्या घोषणा करत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काही पडत नाही. केंद्र व राज्य सरकारचं धोरण हे बळीराजाचा बोट मोडणार आहे. सरकारचे शेतकऱ्यांप्रती पुतना मावशी प्रेम असून सरकारच कृषीविषयक धोरण शेतकरी विरोधी …

Read More »

मुंबईतील या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर विधानसभा आणि विधान परिषदेत मंत्री दादाजी भुसे यांनी मांडला ठराव

विधानसभा निवडणूकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना जाहिर करण्याची घाई करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहिर करण्यात आली. त्याच धर्तीवर आता मराठी भाषेच्या मुद्यांवरून पुन्हा एकदा मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, …सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर होल्डिंग पाँडस्, मायक्रो टनेलमुळे पाणी निचरा होण्यास मदत

हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज, बार, रेस्टॉरंटवरही कारवाई 'ड्रंक अँड ड्राईव्ह' रोखण्यासाठी कडक कारवाया करा

मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया करण्यात याव्यात, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क, सज्ज रहावे मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट

राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास …

Read More »

हिट अॅड रन प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कायद्यासमोर सर्व समान शिंदे गटाच्या नेत्याच्या पोरगा अपघात करून झाला फरार

पुणे येथील पोर्शे प्रकरण ताजे असतानाच शिंदे गटाच्या नेत्याच्या पोराने वरळी येथे मच्छिमारी विक्रीसाठी निघालेल्या नवरा बायकोच्या स्कूटरला धडक दिली. विशेष म्हणजे धडक दिल्यानंतरही अपघाती महिलेच्या अंगावरून गाडी घालून फरफटत नेले. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्याचा पोरगा फरार झाला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्याकडूनच हिट-अॅड-रनचा आणखी एक प्रकार घडला. या प्रकरणी बोलताना …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, येणारी निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची गद्दार, लाचारांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ द्यायची नाही

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील सर्वच राजकिय पक्षांनी पक्ष बांधणी आणि मतदारांना बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्ताधारी पक्षाकडून आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला आकर्षित करण्यासाठी माझी बहिण लाडकी योजना सुरु केली. तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. …

Read More »

शिंदे गटाच्या राजेश शहाच्या मुलाचा प्रतापः बीएमडब्लू कारने महिलेचे प्राण घेऊन फरार पोलिसांकडून शोधाशोध सुरु केल्याची माहिती

पुणे येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर पैसेवाल्या आणि सत्तेची धुंदी चढलेल्या नेत्यांच्या पोरांच्या यादीत आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाच्या हिट अॅण्ड रन या घटनेची भर पडली आहे. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या पोराने मुंबई वरळी येथील एका मच्छिमार महिलेला धडक तर दिली. पण नंतर सदर महिलेच्या …

Read More »

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे. नवी दिल्ली येथे १० जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, ७० दिवसानंतर खरी मॅच सुरु होईल तेंव्हा… कॅच घेईल राज्यातील पोलीसही असुरक्षित, गृहमंत्र्यांच्या फक्त घोषणा, कृती मात्र शून्य

शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक …

Read More »