Tag Archives: eknath shinde

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला अपघातग्रस्तांना मदतीचा हात विक्रोळीजवळील अपघातग्रस्तांना ताफ्यातील गाडी देऊन गोदरेज रुग्णालयात केले दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. …

Read More »

विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे यांचे वारकरी दिंड्याना वीस हजार रुपयांचे अनुदान वारकऱ्यांच्या मागणीनुसार दौंडचा प्रस्तावित कत्तलखाना रद्द, वारकऱ्यांना अपघात गटविमा, वाहनांना टोल माफी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीतील भाजपा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक ते दिड टक्का मतदान कमी झाल्याची माहिती भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूकीला अद्याप तीन ते चार महिन्यांचा अवकाश असला तरी कमी झालेल्या मतांची टक्केवारी …

Read More »

वक्फ मंडळाला निधी देण्यावरून राज्य सरकारने केला खुलासा संयुक्त संसदीय समितीच्या सूचनेनुसारच वक्फ मंडळाला निधी देण्याचा निर्णय

देशातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य करत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने विविध विशिष्ट धर्मियांना लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केला गेला. मात्र यामुळे देशातील दोन समाजात सरळ दोन तट निर्माण होत आहेत याकडे केंद्रातील सत्ताधारी पक्षाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यातच …

Read More »

महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन, अर्थसंकल्प सादर होणार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

देशातील लोकसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्याचा निकालही जाहिर झाला. मात्र ऐन मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने त्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करता आला नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती यापूर्वीच अजित पवार यांनी दिली होती. त्यातच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, औद्योगिक सुरक्षेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे कुठे ? डोंबिवलीनंतर नागरपूरातील कंपनीतही स्फोट

गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा जीव गेला होता. डोंबिवली MIDC मधून दर आठवड्याला स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येत आहे. या घटना सतत घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पुढे …

Read More »

वर्सोवा खाडीजवळील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट जेसीबी ऑपरेटर राकेश यादव यांच्या कुटूंबियांना ५० लाखांची मदत तर कुटूंबातील एका सदस्याला मिळणार नोकरी

ससूनघर गावापाशी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची महिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने संयुक्त बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वर्सोवा खाडीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून एल अँड …

Read More »

किसान सभेचा आरोप, राज्याचा कृषी विभाग अद्यापही निष्क्रिय खरीप हंगाम तयारीबाबत राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

राज्यात मान्सून सक्रिय झाला असताना राज्य सरकार व राज्याचा कृषी विभाग अजूनही खरीप तयारीबाबत निष्क्रियता सोडताना दिसत नाही. खरीपाची जशी शेतकरी प्राधान्याने तयारी करतात तशीच तयारी शासन-प्रशासनाच्या वतीनेही होणे अपेक्षित असते. राज्यभर तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर लोकप्रतिनिधी, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या खरीप नियोजन बैठकांमध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची मागणी, पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी पहिल्यांदाच केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस मुख्यमंत्री उपस्थित

तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळून त्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,… टँकर भरण्यासाठी सोलर पंप वापरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी उपलब्धता, पावसाचा आढावा

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात १ ते ११ जून पर्यंत संपुर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे …

Read More »

वक्फ मंडळासाठी राज्य सरकारकडून ​१० कोटींच्या निधी शासन निर्णयही जारी केला

राज्यातील महायुतीच्या राज्य सरकारने ​वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० कोटींच्या निधीची तरतूद ​केली असून त्यापैकी २ कोटी रुपयांचे ​१० जूनला वित​रीत केल्याचा शासन आदेश अल्पसंख्यांक विकास विभागाने काढला आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या महायुतीच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ​ केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना वर्ष …

Read More »