लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी तब्बल ११ दिवसांनी जाहिर केली. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करत मतदान प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम …
Read More »ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपाने डावलत त्यांच्या मुलाला दिली उमेदवारी
महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केलेले कैसरगंजचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना भाजपाने डावलून त्यांचा मुलगा करण याला उमेदवारी दिली. करण भूषण सिंग हा ब्रिजभूषण सिंग यांचा धाकटा मुलगा आहे, ज्यांनी सलग तीन वेळा उत्तर प्रदेशची जागा जिंकली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ब्रिजभूषण कैसरगंजमधून दोन लाख मतांनी विजयी …
Read More »उमेदवारांच्या खर्चावर असणार खर्च संनियंत्रण कक्षाची नजर
लोकसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्षाची नजर असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांची खर्च सनियंत्रण विषयक बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. …
Read More »चित्रा वाघ यांचा आरोप, पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी अश्लील संस्कृती रुजविण्याचा उद्धव ठाकरेंचा उद्योग
छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पॉप, पार्टी आणि पॉर्न अशी नवी अश्लील संस्कृती रुजवायचा किळसवाणा उद्योग करत आहेत असा प्रहार भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव मृणाल …
Read More »तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या प्रचारापासून बंदी घातली होती. आयोगाने केसीआर यांना पक्षाविरोधात केलेल्या कथित “अपमानजनक” टिप्पण्यांबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीवर नोटीस बजावली. ६ एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, केसीआर यांनी पत्रकार …
Read More »अखेर नाशिकची उत्सुकता संपुष्टातः शिंदे गटाचे हेमंत गोडसेच लोकसभेचे उमेदवार
मागील अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून तर कधी भाजपाकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. त्यातच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहिर केले होते. मात्र …
Read More »महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचा विशेष उपक्रम
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समारंभ पार दादर येथे पडला. यावेळी ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४’ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेल्फी पॉईंट, सह्यांची मोहीम यासह प्रत्यक्ष संवादावर भर देऊन मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती ‘स्वीप’च्या मुख्य समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचा …
Read More »सेक्स स्कँडल आरोपी प्रज्वल रेवन्ना मोदीशहांच्या नाकाखालून परदेशी पळाला
भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नराधमासाठी मते मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत …
Read More »नाना पटोले यांचा इशारा,….तर संविधान व आरक्षणही संपवणार
काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर …
Read More »दक्षिण मुंबईत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी
मुंबईतील असली नसली शिवसेनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सातत्याने शिवसेना उबाठा गटावर आणि राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार यांच्यावर करण्यात येत आहे. तसेच सध्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पक्षांकडून भाजपाला प्रखर विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह …
Read More »
Marathi e-Batmya