विधिमंडळाच्या जून २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी …
Read More »अजित पवार यांची माहिती, कुंडमळा पूल दुर्घटना दुर्दैवी; मदत व बचावकार्याला सुरुवात दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने …
Read More »पुण्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळला, दोघांचा मृत्यू काही लोक वाहून गेले, मृत्यू पावलेल्यांना पाच लाखांची मदत
मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरु असलेली पावसाची संततधार आजही कायम रविवारीही कायम होती. रविवारच्या या दुपारच्या मुसळधार पावसात पुण्यातील इंद्रायणी नदीवरील जुना पूल अर्थात कुंडमळ्यात पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आणि ३२ जण जखमी झाले, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूल कोसळून इंद्रायणी नदीत पडला आणि …
Read More »अजित पवार यांची माहिती, महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापन दिन पुण्यात थाटात साजरा...
महाराष्ट्राचा विकास हाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा राहणार आहे असे जाहीर करतानाच याअगोदरही राज्य आणि देशासाठी काम करत होतो आणि यापुढेही करत राहू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमात दिले. अजित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी …
Read More »महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रूपाली चाकणकर यांना हटवण्याची मागणी महिला नेत्यांमुळे राज्यातले राजकारण तापले
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यांनी मोर्चा उघडला. महिला नेत्यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना आयोगाच्या पदावरून हटवण्याची मागणी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या त्यांच्या कार्य पद्धतीवरून नाराजी वाढली असून विरोधी पक्ष आणि …
Read More »अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना फटकारत म्हणाले, मग काही गोष्टी बोलून का दाखवता? मला हे वादग्रस्त वक्तव्य फार महाग पडतय
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी वादग्रस्त व्यक्तव्ये करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याची दखल घेतली. तसेच माणिकराव कोकाटे यांना फटकारत काही सूचनाही केल्या. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वादग्रस्त व्यक्त केले होते. त्यानंतर नुकतेच अवकाळी पावसामुळे आणि मान्सूनच्या पावसामुळे शेतकऱ्यांची हाताला …
Read More »अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणेसह अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा मान्सूनच्या मुसळधार पाऊसाची अनेक जिल्ह्यात हजेरी
मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात …
Read More »अजित पवार म्हणाले, भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन
भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थशक्ती ठरला आहे, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आणि आनंदाची आहे. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाचे आणि सातत्याने घेतलेल्या ठोस निर्णयांचे फलित आहे. त्यांनी दिलेल्या ‘विकसित भारत-२०४७’चे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण क्षमतेने …
Read More »अजित पवार म्हणाले, भारतीय सैन्यदलांच्या क्षमतेवर देशाला संपूर्ण विश्वास सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी
भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश …
Read More »छगन भुजबळ म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी आजचा निर्णय अतिशय महत्वाचा एकाच आठवड्यात ओबीसी समाजासाठी दोन महत्वपूर्ण निर्णय
राज्यातील महानगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समिती,नगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील चार महिन्यात घेण्यात याव्यात. तसेच यासाठी सन २०२२ पूर्वी लागू असलेली ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेऊन निवडणूक घेण्यात यावी असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे आज विशेष आनंद होत आहे. या …
Read More »
Marathi e-Batmya