शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कृषीमंत्री भरणे यांनी मंत्रालयातून कामकाजास सुरवात केली, त्यावेळी ते बोलत होते. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असून शेती व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाच माझा प्राधान्याचा विषय असेल. …
Read More »अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीपोटी ३३७ कोटी ४१ लाखाच्या निधीस मान्यता बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
अवकाळी पाऊस व गारपीटमुळे राज्यात फेब्रुवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत ३ लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचे …
Read More »वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्ट इशारा… मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, कोकाटे यांच्यासोबत समोरासमोर चर्चा करणार मग निर्णय घेणार
कृषी खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याच्या जागेवर नवे नाशिकचे माणिकराव कोकाटे यांना कृषी पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पद स्विकारल्यापासून काही ना काही वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, ‘सरकार भिकारी आहे’ मंत्रीच म्हणत… हा असंवेदनशिलतेचा कळस कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही का?
महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय? असा प्रश्न पडला आहे. फडणविसांच्या मंत्रिमंडळात एक एक नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर …
Read More »माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करत केली घोषणा २५ हजार कोटी रूपये गुंतवणूकीची योजना
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे वाद असे नवे समीकरण बनले असून त्यांनी शेतकऱ्यांशी निगडीत एकाद्या विषयावर भाष्य केले की, त्याचे रूपांतर लगेच वादात होते. यापार्श्वभूमीवर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळीही शेतकऱ्यांशी संबधित एक नवी योजनेबद्दलची माहिती दिली. त्यातच त्यांच्या सध्याच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून वाद …
Read More »कृषी मंत्री माणिकराव कोकाटे खुलासा, रूपया शेतकरी देत, मग भिकारी कोण… मी कोर्टात खेचणार शेतकऱ्यांकडून सरकार रूपया घेतं मग भिकारी कोणं
दोन दिवसांखाली लातूरमध्ये महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची पत्रकार परिषद होती. परंतु त्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या त्या रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडीओचा निषेध छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. या घटनेचे राजकिय पडसाद उमटायला सुरुवात झाली. त्यातच महाराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिनाचे …
Read More »सुनिल तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची छावा च्या कार्यकर्त्याना मारहाण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात निवेदन दिले
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना सभागृहात बसून ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ आज आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्सच्या खात्यावरून व्हायरल केला. त्यावरून सध्या विरोधकांकडून टीकेची झोड उडविली. त्यातच महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे लातूर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यानच्या काळात छावा …
Read More »कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमीत मग्न, टीकेचा भडिमार नव्या वादाला माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा तोंड फोडले
राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात विधानसभेचे कामकाज सुरु असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईल फोनवर ऑनलाइन रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. त्यामुळे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा नव्या वादात सापडले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर …
Read More »माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी, नवबौद्धांना अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करा पावसाळी अधिवेशनात केली मागणी
आगामी जातीय जणगणनेमुळे निर्माण होणारा पेच लक्षात घेता नवबौद्ध समाजाला अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करावी अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी काल पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला नवबौद्ध समाजाच्या संवैधानिक हक्कांसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले. दीक्षाभूमीपासूनचा प्रवास आणि आजचा संघर्ष आमदार राजकुमार …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, आता राज्य उत्पादन शुल्क विभागातही ५०ः५० प्रमाणे पदोन्नती दुय्यम निरिक्षक पदासाठी भरती प्रक्रियेत बदल
राज्य उत्पादन शुल्क विभागातील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा दुय्यम निरिक्षक (गट -क) पदासाठी सध्या सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट करत दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानांमधून केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज …
Read More »
Marathi e-Batmya