अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी सादर केल्या ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कुंभमेळा, रस्ते, मेट्रो, सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांची निर्मिती, मागास घटक विकासासाठी मागण्या सादर

विधिमंडळाच्या जून २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या.  हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच दुर्बल, वंचित समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांपैकी १९ हजार १८३ कोटी ८५ लाख रुपये अनिवार्य तर ३४ हजार ६६१ कोटी ३४ लाख रुपये कार्यक्रमांतर्गत आणि ३ हजार ६६४ कोटी ५२ लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत. स्थूल पुरवणी मागण्या ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ४० हजार ६४४ कोटी ६९ लाख रुपयांचा आहे.

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक ११ हजार ४२ कोटी ७६ लाख रुपये हे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहेत. ३ हजार २२८ कोटी ३८ लाख रुपये हे मेट्रो प्रकल्प, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोनसाठी २ हजार १८२ कोटी ६९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचबरोबर ५७ हजार कोटी रूपयांतून खालील विभागासाठी निधी मागण्यात आला आहे.

मुद्रांक शुल्क अधिभार परतावाः ३ हजार २२८.३८

मुंबई मेट्रो प्रकल्प-भूयारी मार्ग बांधकाम राज्य हिश्शाची रक्कम-२,२४०.८२

सहकारी साखर कारखान्यांच्या खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन- २,१८२.६९

केंद्र सरकारकडून भांडवली खर्चासाठी बिनव्याजी विशेष सहाय्य-२,१५०

अपूर्ण सिंचन पूर्ण करण्यासाठी आणि पूर्ण सिंचन प्रकल्पांच्या कामातील सुधारणेसाठी नाबार्डकडून कर्ज- २०९६.५८

जिल्हा व इतर मार्ग रस्ते व पूलासाठी अतिरिक्त नियतव्यय-२०००

श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकांसाठी-२,०००

एकात्मिक बाल विकास योजनंतर्गत अंगणवाडी शिक्षका आणि मदतनीसांचे मानधन-१,६८९.०३

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी-१,६००

संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण घटकांसाठी-१,५००

नागरी पायाभूत विकास निधी अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्ज-१,५००

रेवस रेड्डी सागरी विकास मार्ग व पुणे चक्राकार महामार्ग, जालना-नांदेड द्रुतगती मार्ग प्रकल्पाच्या भाग भांडवलासाठी-१,५००

इतर मागास-विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती करीता-१३००

शासकिय वैद्यकिय महाविद्यालये व रूग्णालयांसाठी आशियाई बँकेकडून अतिरिक्त नियतव्यव- १,१८०.५९

राज्य परिवहन महामंडळाच्या सवलत मूल्याची प्रतिपूर्ती-१०००

सिंहस्थ कुंभ मेळ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी यावरील खर्चाकरिता-१,०००

केंद्र सरकारच्या अमृत योजनेतंर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पायाभूत सुविधांचा विकास – ९८९

सर्व आकडे हजार कोटीत

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही घट होणार १३ परवानग्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न

महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून ३३ परवानग्यांपैकी २० परवानग्या स्व-प्रमाणनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *