Tag Archives: mangal prabhat lodha

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी १०८८ कोटी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद-पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारण्यासाठी भरीव उपाययोजना करिता सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) १०१२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी अशा एकूण १०८८.७१ कोटी निधींची तरतूद करण्यात आली आहे, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री …

Read More »

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांसाठी १९५८ महाविद्यालयांचे अर्ज दाखल कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून, आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्री मंगलप्रभात …

Read More »

रामदास आठवले म्हणाले, व्यवसायाभिमुख कौशल्य काळाची गरज अधिकाधिक रोजगार निर्माण करणार - मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, … मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारणार

स्वराज्याबरोबर सुराज्य निर्माण करणे तसेच रयतेचे राज्य आणण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे काम पुढे अविरत सुरू ठेवलं. राज्य शासन हाच विचार पुढे घेऊन जात असून समता, बंधुता, न्याय या तत्वाद्वारे मागासवर्गीय घटकांना विकासाच्या मुख्य …

Read More »

आता तालुकास्तरीय नमो रोजगार मेळावे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून आढावा बैठकीचे आयोजन

तालुकास्तरीय रोजगार मिळावे, नमो महारोजगार मेळावा २०२४ ची पूर्वतयारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातील आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया यासह विभागाच्या कामकाजाचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी १८ जून रोजी मंत्रालयात आढावा घेतला. कौशल्य विकास विभागाची येत्या ३ महिन्यांची रूपरेषा ठरलेली असून, तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी …

Read More »

लक्ष्‍मी मित्तल ग्रुपसह १९ सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी

देशाच्‍या विकासात आता चंद्रपूर महत्‍वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍मी मित्तल ग्रुपसह १९ कंपन्यांशी सामंजस्‍य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्‍यांच्‍या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्‍या विकासातही हातभार लावेल, असे प्रतिपादन वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात…

पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी पी.एम. विश्वकर्मा सन्मान योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतही अग्रेसर राहील, असा विश्वास आहे. या योजनेत जास्तीत जास्त होतकरू तरुणांनी सहभागी व्हावे. या योजनेअंतर्गत २०२८ पर्यंत तीन लाख कारागिरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचे …

Read More »

आनंद महिंद्रा यांचे आश्वासन, पुढील वर्षी अधिक लोकप्रिय उपक्रम राबवणार

मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद मंहिद्रा यांनी पुढील वर्षीपासून लोकप्रिय उपक्रम राबविणार असल्याचे आश्वासन देत मुंबई फेस्टीवलमधील कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. गेले आठ दिवस सुरू असलेला मुंबई फेस्टिवल २०२४ चा आज समारोप होत आहे. एक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ती रेस आज संपली आहे असे वाटत आहे. …

Read More »

‘स्किल सेंटर ऑन व्हील’ बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास व उद्योजकता, नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत स्किल सेंटर ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत फिरत्या बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कौशल्य विभागाच्या आयुक्त निधी चौधरी उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी या बसची पाहणी करून बस विषयी माहिती …

Read More »

श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभासाठी २ लाखापेक्षा जास्त खेळाडू सज्ज

राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ’ स्पर्धा येत्या २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई शहरात आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन …

Read More »