राज्यातील कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी (महाकेअर)च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपचार व संशोधन सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी संचालक मंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. यावेळी वैद्यकीय शिक्षण …
Read More »मुख्यमंत्री यांचा वाढदिवस व दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ‘महा आरोग्य शिबिर’ वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत ‘महा आरोग्य शिबिर’ ओयोजित करण्यात आले आहे. या अभियानाची सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, संलग्न रुग्णालये तसेच शासकीय दंत, आयुर्वेद आणि होमिओपॅथी महाविद्यालयांनी अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या अभियानाचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा, यासाठी व्यापक …
Read More »हसन मुश्रीफ यांची माहिती, नवीन व श्रेणीवर्धित बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करणार
राज्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी कुशल परिचारिकांची उपलब्धता वाढविणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयांमधून कमी शैक्षणिक शुल्कात दर्जेदार नर्सिंग शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने नर्सिंग शिक्षणाच्या व्यापक विस्ताराचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत केले. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाच्या …
Read More »हसन मुश्रीफ यांची माहिती, एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या विकास शुल्कातील बदल तसेच विद्यार्थ्यांना ओबीसी धर्तीवर शुल्क सवलतीबाबत शासन सकारात्मक
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील बदल तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक शुल्क सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्रालयामध्ये आज राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील …
Read More »राज्यातील कर्करोग उपचारासाठीच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरीः महाकेअरची स्थापना महाकेअर फाऊंडेशनची स्थापना, त्रिस्तरीय रचनेतून राज्यभरातील १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार
राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) कंपनी स्थापन करण्यास तसेच या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजाणी करावी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश
जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपीची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्ययावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना सादर करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिल्या. मंत्रालय येथे जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भावबाबत झालेल्या आढावा बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व …
Read More »सर ज.जी. रुग्णालयात हृदय, किडनी व यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश
सर ज.जी रुग्णालयाचे राज्यात मोठे नाव आहे. या रुग्णालयात हृदय, किडनी व यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी आवश्यक साधने व उपकरणे उपलब्ध करुन दिली जातील. तसेच सर ज. जी. समूह रुग्णालयातील सर्वच वॉर्डचे नूतनीकरण करण्यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारमुळे पालक-विद्यार्थी देशोधडीला लागणार कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा महायुतीचा निर्णय
राज्यातील खाजगी विनाअनुदानित आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून शैक्षणिक शुल्काच्या पाच पट शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारने तात्काळ स्थगित करावा. कारण महायुती सरकारने असंविधानिकपणे, कायद्याची पायमल्ली करुन आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन हा निर्णय घेतला आहे. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आर्थिक …
Read More »१० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे प्रयत्न वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० (एम.बी.बी.एस.) विद्यार्थी क्षमतेची परवानगी दिलेली आहे. उर्वरीत ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ …
Read More »हसन मुश्रीफ यांची माहिती, पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारणार विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली माहिती
पुणे शहरातील ससून सर्वोपचार रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवून ससून रुग्णालय परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या …
Read More »
Marathi e-Batmya