Tag Archives: ncp

नवाब मलिकांच्या आरोपाला वानखेडेचे प्रतित्युर, मी कारवाई करणार… मी मालदीव मध्ये होतो पण कोणत्याही अभिनेत्याला भेटलो नाही

मुंबई: प्रतिनिधी मालदीव येथील सहलीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर समीर वानखेडे यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावत म्हणाले, मी कुटुंबासोबत मालदीवला गेलो होतो. यासाठी मी अधिकृत सुट्टी देखील घेतली होती. याचे पैसे देखील मी स्वत: दिले. तसेच मी बहिणीसोबत …

Read More »

‘जीएसटी‘ तील सुधारणेसाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झाली देशातील अर्थमंत्र्यांची बैठक केंद्रीय स्थायी मंत्रीगटाचे अध्यक्ष अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : प्रतिनिधी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन वस्तू व सेवा करयंत्रणा (जीएसटीएन) सोपी, सुरळीत, दोषविरहीत करण्यासाठी देशातील अनेक राज्यांकडून चांगल्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. उर्वरीत राज्यांकडून येणाऱ्या सूचनांचा आढावा घेऊन सर्वंकष अहवाल महिन्याभरात तयार करण्याचे निर्देश ‘जीएसटी’च्या केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना दिले. हा अहवाल जीएसटी सुधारणांसाठी स्थापन केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाच्या पुढील …

Read More »

समीर वानखेडे आणि कुटंबियांबाबत मलिक यांचा नवा गौप्यस्फोट तर मनसे-जस्मिनचे प्रत्युत्तर मालदीवमधून सर्व वसुली करण्यात आलीय ;समीर वानखेडेच्या परिवारातील सदस्य उपस्थित

मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. दरम्यान मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे मलिक यांनी …

Read More »

भाजपा, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी भाजपा, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. दरम्यान महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर …

Read More »

पाटलांची जीभ घसरली आता पाय घसरला जाऊ नयेः आर्यनचे ते व्हिडिओ जाहिर करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका आणि मागणी

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यानंतर आज अखेर चंद्रकांत पाटील यांनी आपली जीभ घसरल्याचे मान्य करत त्याबाबत जाहिरपणे दिलीगिरी व्यक्त केली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक म्हणाले की, …

Read More »

अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे ‘राष्ट्रवादी’चे प्रयत्न भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र

मुंबईः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे …

Read More »

मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या की जनतेच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी मागील सहा महिन्यापासून सातत्याने देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सद्यपरिस्थितीत देशातील जवळपास १२ राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दराने १०० री ओलांडली असल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. २०१४ साली देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दर कमी झाले होते. त्यावेळी गुजरात मध्ये झालेल्या …

Read More »

शरद पवार लवकरचं भेटणार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहना सीमा सुरक्षा दलाला दिलेल्या अधिकारामुळे देशाच्या फेडरल स्ट्रक्चरला धक्का

पिंपरी-चिंचवड: प्रतिनिधी राज्य आणि केंद्र अधिकाराच्या अनुषंगाने राज्यघटनेने निर्धारीत केलेल्या फेडरल स्ट्रक्चरला धक्का देणारा निर्णय केंद्र सरकारने पुन्हा एकदा घेत आंतरराष्ट्रीय सीमावर्ती असलेल्या भागातील राज्यांच्या ५० किलोमीटर परिसरात तपासणी करण्याचे राज्यांच्या पोलिसांइतकेच अधिकार केंद्रीय सीमा सुरक्षा दलास दिला. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्राने राज्यांच्या अधिकार अतिक्रमण केल्याप्रकरणी आपण लवकरच केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात… घाबरणार नाही पण आम्ही उंदीर बाहेर काढू राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई: प्रतिनिधी अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात…आम्ही कुणाला घाबरणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. देवेंद्र फडणवीस यांनी एजन्सीचा वापर केला असता तर अर्धे मंत्रीमंडळ तुरुंगात असते असे वक्तव्य केले होते त्याचा नवाब मलिक यांनी …

Read More »

शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना दिला गंभीर इशारा शेतकऱ्यांना अस्वस्थ होवू देवू नका अस्वस्थ पंजाबची एकदा किंमत मोजलीय

पुणे : प्रतिनिधी पंजाबची सीमा ही पाकिस्तानला जोडून आहे. त्यामुळे देशासाठी असा त्याग करणारा, अन्नधान्यात स्वयंपूर्णता करणारा हा घटक काही प्रश्नांवर आग्रहाने आंदोलनाला बसला असेल तर त्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ही राष्ट्रीय गरज असल्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करत पंजाबमधील शेतकरी अस्वस्थ …

Read More »