Tag Archives: ncp

नाना पटोलेंची विधानसभा अध्यक्षपदी निवड बिनविरोध निवड झाल्याचे हंगामी अध्यक्षांकडून जाहीर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्तास्थापनेवर महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकत राजकिय नाट्यावर तुर्तास पडदा पडला. त्यामुळे सांसदीय राजकारणातील पुढील कायमस्वरूपी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीतून भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या नाना पटोले यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. यासंदर्भातची घोषणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात …

Read More »

फडणवीस आणि भाजपाच्या रूपाने मजबूत विरोधी पक्ष आम्ही दिला मंत्री छगन भुजबळ यांचा भाजपा नेते फडणवीसांना उपरोधिक टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी समोर मजबूत विरोधी पक्ष दिसत नसल्याची टीका करत होते. मात्र त्यांच्या व भाजपाच्या रूपाने राज्यातील जनतेला सशम आणि मजबूत विरोधी पक्ष दिल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिक टोला लगाविला. त्यांच्या या वक्तव्याने …

Read More »

विधानसभेत मविआच्या १६९ मतांना पाहून भाजपाने केला सभात्याग मनसे आणि मार्क्सवादी आणि एमआयएम तटस्थ

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या राजकिय नाट्यावर आज शनिवारी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर १६९ आमदारांनी विश्वास दाखविल्याने पडदा पडला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांबरोबर बहुजन विकास आघाडीच्या दोन, प्रहार संघटनेच्या एक आणि एका अपक्ष आमदाराने विश्वास दाखविला. विशेष म्हणजे बहुमत …

Read More »

शरद पवार करणार मविआच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात नवी नांदी भाजपेतर पक्षांच्या आघाडीचे पुन्हा एकदा यशस्वी प्रयत्न?

मुंबईः विशेष प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सातारा आणि सोलापूरात केलेल्या घोषणेनुसार राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ता उलथवून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची आणि अनेकांना घरी बसविल्याशिवाय मी घरी जाणार नसल्याची घोषणा केली. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाची शपथ …

Read More »

शिकाँराकडून राज्यपालांच्या कार्यालयाकडे सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दाव्याचे पत्र सादर

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्री पदी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र या दोघांच्या सरकारला बहुमताचे संख्याबळ नसून ते संख्याबळ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकिय आघाडीला असल्याचा दावा या तिन्ही पक्षांनी करत सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावे अशी मागणी या …

Read More »

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजित पवारांच्या शुध्दीकरणाची भाजपाकडून सुरुवात विदर्भ पाटबंधारेतील ९ प्रकल्पांच्या नस्तीबंद करण्याचे आदेश

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराचे डाग पुसून काढण्याच्या हालचाली भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केली. या शुध्दीकरणाच्या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील विदर्भ पाटबंधारे अंतर्गत असलेल्या ९ प्रकल्पांच्या चौकशीच्या फाईली बंद करण्याचे आदेश एसीबीने दिले. विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या आधी उपमुख्यमंत्री …

Read More »

शरद पवारांच्या पुलोदची पुनःरावृत्ती की मराठेशाहीतील फंदफितुरीची परंपरा ? विधानसभेत दिसणार राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा

साधारणतः १९७८ साली राज्यातील मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पाडत त्यावेळचे काँग्रेस नेते शरद पवार यांनी समाजवादी पक्ष, जनसंघ सारख्या पक्षांना सोबत घेत पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग करत नवे सरकार स्थापन केले होते. त्यास जवळपास ४१ वर्षे झाली. नेमक्या त्याच पध्दतीची राजकिय परिस्थिती राज्याच्या राजकारणात दिसून येत असून …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, रात्रीस चालेचा नवा खेळ सुरू झालाय संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपावर टीका

मुंबईः विशेष प्रतिनिधी मध्यरात्रीपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने पवारसाहेबांनी चित्र स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात हा खेळ सुरु आहे, तो लाजिरवाणा आहे. नवं हिंदुत्व दाखवलं जात आहे. ते हिंदुत्व नाही. ईव्हीएमचा खेळखंडोबा पुरला नाही म्हणून हा रात्रीस खेळ चालेचा खेळ सुरू केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भल्या पहाटे स्थापन झालेल्या …

Read More »

शिकाँरात आम्ही आहोत…राहणार आणि सरकारही येणार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असून त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. त्याचबरोबर जे आमदार त्यांच्यासोबत गेले ते परत आमच्याशी संपर्क साधून आमच्याकडे येत असल्याचे सांगत शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहोत, एकत्र राहणार असून राज्यात या तीन पक्षाचे सरकार येणार …

Read More »

ठाकरे घराण्याचा रिमोट कंट्रोल संपुष्टात, आता थेट मुख्यमंत्री पदच शरद पवारांच्या भूमिकेने शिवसेनेची परंपरा खंडीत होणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ताकारणाच्या खेळात आतापर्यंत रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून राजकिय सोंगट्या हलविणाऱ्या शिवसेनेने आता विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून कात टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच शरद पवारांच्या वक्तव्याने शिवसेना सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्ती आता थेट मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले. हिंदूत्ववादाच्या मुद्यावरून शिवसेनेने …

Read More »