Tag Archives: ncp

एकीकडे मराठीचा उदोउदो तर दुसरीकडे हिंदीत बॅनरबाजी भाजपाच्या दुटप्पी धोरणावर नवाब मलिक यांची टिका

नागपूरः प्रतिनिधी एकीकडे मराठीचा उदोउदो करायचा आणि दुसरीकडे सावरकरप्रकरणी आंदोलन करताना हिंदीत बॅनर झळकवायचे अशा प्रकारच्या भाजपच्या दुटप्पी धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात भाजपा मराठी विषयी प्रेम व्यक्त करते मात्र आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सावरकरप्रकरणी हिंदीमध्ये बॅनर झळकवण्यात आले …

Read More »

शिवस्मारकातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे स्वागत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षात भाजपाच्या सरकारने प्रचंड घोटाळे केले. त्या सर्व घोटाळ्यांना क्लीन चिट दिली. परंतु त्यातही ज्या शिवरायांचे नाव घेऊन भाजप सत्तेवर आली त्यांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे प्रचंड मोठे पातक भाजपने केल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उघडकीस आणलेल्या शिवस्मारक घोटाळ्यातील आरोपांना कॅगने अधोरेखीत केले. या घोटाळ्याची मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावे ५० हजार रू.ची रक्कम डिपॉझिट ठेवणार आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी... समाजातील तरुण पिढीशी - शरद पवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सन्मान जगता यावे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त आज जो धनादेश दिला तो वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत ५० …

Read More »

जून्यांचे अनेक कर्मचारी-अधिकारी नव्या मंत्र्यांच्या प्रतिक्षेत २०० हून अधिकजण आजारपणाच्या सुट्टीवर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील मंत्र्याकडे आणि त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शिपायांना नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे वेध लागलेले आहे. त्यामुळे जून्या मंत्र्यांच्या कडच्या अनुभवाचा फायदा नव्या मंत्र्याकडे करून घेण्यासाठी या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मूळ विभागात रूजू होण्याऐवजी आजारपणाच्या सुट्टीवर जाणे पसंत केल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गतवेळच्या राज्य मंत्रिमंडळातील बहुतांष मंत्र्यांकडे विशेष …

Read More »

देशात भाजपा विभाजनकारी मानसिकता आणतेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी देशात विभाजनकारी मानसिकता करण्यापलीकडे भाजपाला काही दिसत नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. आज संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा पास करण्यात आला. धर्माच्या आधारावर नागरीकत्व कायदा करणं योग्य नाही. आसाम राज्यात बाहेरची लोकं आहेत. नागरिकत्व रजिस्टर झालं …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रवादीची ८० लाख रूपयांची मदत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी होणार मदतीचे वाटप करणार

मुंबईः प्रतिनिधी मान्सूनचा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हेक्टरी ८ आणि १८ हजार रूपयांची मदत जाहीर केली. मात्र ही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांसाठी अपुरी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ८० लाख रूपयांच्या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. …

Read More »

अभिनंदनावेळी मुख्यमंत्री म्हणाले “मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो” संसदीय भाषेत मुख्यमंत्री ठाकरेंची फडणवीसांवर टोलेबाजी

मुंबईः विशेष प्रतिनिधी भाषण काल माझा सभागृहातला पहिला दिवस होता. मी माझ्या मंत्र्यांची सभागृहात ओळख करुन दिली. आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यासाठी मी उभा असून माझ्यासमोर त्यांची जी ओळख आली, ती आधीच यायला पाहीजे होती अशी उपरोधिक चिमटा काढत मी येईन असे कधी म्हणालो नव्हतो पण इथे आलो असे फडणवीस …

Read More »

फडणवीस हे कोणात्याही प्रलोभनाला बळी पडणार नाहीत अशी अपेक्षा मंत्री जयंत पाटील यांचा विरोधी पक्षनेते आणि अजित पवारांना टोला

मुंबईः विशेष प्रतिनिधी राजकारणात सत्तेच्या बाकावर किंवा विरोधकांच्या बाकावर असो आपली सद्सदविवेक बुध्दी शाबूत ठेवावी लागते. जर सद्सदविवेक बुध्दी हरवली की आपली दिशा आणि ध्येक चुकते. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे इथल्या कोणत्याही सदस्यांच्या प्रलोभनाला बळी पडून त्या बाकावरून या बाकावर येण्याचा प्रयत्न करणार नाहीत असा …

Read More »

विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसांची नियुक्ती तर मुख्यमंत्री आणि पाटील यांची फटकेबाजी नवनिर्वाचित विधानसभाध्यक्ष पटोले यांच्याकडून जाहीर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अनुक्रमे विधानसभाध्यक्ष पदावरील व्यक्तीची निवड करण्यात आल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी भाजपाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र त्यांच्या निवडीचे स्वागत करताना भाजपाने बाके वाजवून केले तर …

Read More »

नाना पटोलेंची विधानसभा अध्यक्षपदी निवड बिनविरोध निवड झाल्याचे हंगामी अध्यक्षांकडून जाहीर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्तास्थापनेवर महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकत राजकिय नाट्यावर तुर्तास पडदा पडला. त्यामुळे सांसदीय राजकारणातील पुढील कायमस्वरूपी विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीतून भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या नाना पटोले यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. यासंदर्भातची घोषणा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात …

Read More »