Tag Archives: ncp

पावसाळी अधिवेशनः ५० खोके एकदम ओके…., आले रे आले गद्दार आले…. गगणभेदी घोषणांनी विधानभवन दणाणले

शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर या सरकारचं हे पहिले पावसाळी अधिवेशन, पायउतार झालेले कालचे सत्ताधारी आणि आजचे विरोधक जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होते. आज त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापुर्वी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून क्रिएटिव्ह अशी रचनात्मक घोषणाबाजी केली. ५० खोके… एकदम ओके… या सरकारचं …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांना त्रास होणार कारण…. शिदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा त्रास होणार

उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. पण त्यांचे पत्र आम्हाला मिळाले. ते सात-आठ पानाचे आहे. ते पत्र बघताना मला वाटले तो अंतिम आठवडा प्रस्ताव आहे अशी कोपरखळी लगावत. त्यांनी लक्षात घ्यावं की आम्हाला सत्तेवर येवून …

Read More »

अजित पवार म्हणाले, मग आम्ही पण शक्तीमान असल्याचे दाखविण्यासाठी तसं… प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीच्या सवालावर अजित पवारांचे उत्तर

शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर राज्याचे पहिलेच विधिमंडळ अधिवेशन होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर बैठकीत चर्चेची माहिती देण्यासाठी विधिमंडळ भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, एक आमदार कोणाचा कोथळा काढा, हात पाय तोडा अशी भाषा करत आहेत. एक बहाद्दर आमदार …

Read More »

अजित पवार यांनी सत्ताधारी आमदारांना दिला दम, सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि संतोष बांगर यांच्या कृत्यावरून दिला दम

काही दिवसांपूर्वी राज्यात शिंदे-फडणवीसचे सरकार सत्तेवर आले. मात्र या सरकारला अद्याप विधीची मान्यता मिळालेली नाही. विश्वासघाताच्या आणि अविश्वासाच्या बळावर हे सरकार उभे राहिले आहे. मात्र या सरकारच्या एका आमदाराकडून हात नाही मोडता आला तर तंगड तोडा असे त्यांच्या समर्थकांना सांगत आहे. तर आणखी एका आमदाराने सरकारी कर्मचाऱ्यावर हात उचलला. यावरून …

Read More »

अजित पवार म्हणाले, आज महागाई, बेरोजगारीसारख्या गंभीर समस्या पण… स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात साजरा; विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी अजित पवार यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा हा दिवस ज्यांच्यामुळे दिसला, देशासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले, हौतात्म्य पत्करले त्या सर्वांना अजित पवार यांनी यावेळी अभिवादन केले. आज …

Read More »

खातेवाटपानंतर अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली महत्वाची खाती भाजपाकडे

विरोधकांच्या सततच्या टीकेमुळे अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर चार दिवस संपत आले तरी खातेवाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर खात्यांचे वाटप झाले. या खातेवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. खाते वाटपानंतर ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले, भाजपाने …

Read More »

छगन भुजबळ यांचा सवाल, अमृतचे मुख्यालय नेण्याचे कारणच काय ? कार्यालयाच्या स्थलांतराचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील युवक युवतींना व इतर उमेदवारासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी म्हणजेच अमृत या संस्थेची निर्मिती केलेली आहे. महाविकास आघाडी सरकारने या संस्थेचे मुख्यालय नाशिकला मंजूर केले होते. मात्र शिंदे सरकारने लगेच नाशिकचे मुख्यालय पुणे येथे स्थलांतरित केले. हे अमृतचे मुख्यालय नाशिकहून …

Read More »

जयंत पाटील यांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ते त्यांचे कामच पण… बिन खात्याचे मंत्री करणार ध्वजारोहण

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असतानाही अद्याप मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आलेले नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादाच बिन खात्याचे मंत्री ध्वजारोहण करणार असल्याची टीका केली. त्यावर जयंत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांचे कामच आरोप करण्याचे आहे, सरकारचे काम मात्र लोकहिताचे …

Read More »

जयंत पाटील प्रति सेनाभवनावरून म्हणाले, ताकद मोठी पण देव पहिल्या सेनाभवनात… पूजा अर्जा करण्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा

जवळपास सव्वा महिना होत आला राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न होवून. मात्र या सव्वा महिन्यात जितकी चर्चा एकनाथ शिंदे यांच्या उठावाची झाली तितकीच त्यांच्या प्रार्थनास्थळांना भेटी देण्याचीही झाली. तसेच आता शिवसेनेला प्रत्युत्तर म्हणून प्रतिसेनाभवनही बांधण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे गटाकडून करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता …

Read More »

अजित पवार यांच्या ‘त्या’ मागणीने प्रशासनाला प्रश्न, उत्तरांना मान्यता कोण देणार? विधिमंडळाकडून उत्तरे पाठविण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून ३९ दिवस झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. आता मंत्रिमंडळ विस्तार होवून तीन दिवस होत आले तरी अद्याप मंत्र्याना खाते वाटप झालेले नाही. त्यातच १७ तारखेपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरे न घेण्याची भूमिका घेणाऱ्या सरकारने आता प्रश्नोत्तरे घेण्याची …

Read More »