Tag Archives: ration card

रेशन कार्डसाठीच्या ५९,००० रुपयांच्या जाचक अटीविरोधात जनता दल (सेक्युलर) आक्रमक ३० दिवसांत निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा इशारा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) मोफत रेशन मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठरवलेली ५९,००० रुपयांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अत्यंत जुनी आणि असंवेदनशील आहे. ही अट बदलून ती अडीच लाख (₹२,५०,०००) रुपये करावी, या मागणीसाठी मुंबई जनता दल (सेक्युलर) पक्षाचे अध्यक्ष सुरेंद्रकुमार बाजपेयी यांनी थेट अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र्यांकडे लेखी …

Read More »

राज्य सरकारने अंत्योदय कुटुंबांसाठीची मोफत साडीची योजना तीन वर्षातच गुंडाळली वस्त्रोद्योग विभागाने कॅप्टिव्ह मार्केट योजना बंद केल्याचा जीआर केला जारी

निवडणूकांना नजरे समोर ठेवत राज्य सरकारने अंत्योदय कुटुंबासाठी मोफत साडी देण्याची योजना अर्थात कॅप्टिव्ह मार्केट योजनेतंर्गत मोफत साडी वाटपाची योजना  राज्य सरकारने मोठ्या धुमधडाक्यात सुरु केली. त्यावेळी अंत्योदय योजनेखालील काही कुटुंबियाना मोफत साडीचे वाटपही करण्यात आले. मात्र लाडक्या बहिणींच्या हप्त्यांमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या राज्य सरकारला आता अंत्योदय कुंटुबातील महिलेसाठी एक …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश, आधार, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र ग्राह्य धरा मतदार याद्या पुनरिक्षण रोखण्यास नकार

भारताच्या निवडणूक आयोगाला मतदानासाठी असलेल्या बिहारमधील मतदार याद्यांचे विशेष गहन पुनरिक्षण (SIR) करण्यापासून रोखण्यास नकार देताना, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मतदान पॅनेलला याद्या अद्ययावत करण्याच्या हेतूने आधार, मतदार ओळखपत्र आणि रेशनकार्ड यांचाही विचार करण्याची सूचना केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि जॉयमाल्या बागची यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने सांगितले की, ते या …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ?;अशा हुकूमशाहीला…

मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ? असा संतप्त सवाल करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिला. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या …

Read More »

शिधापत्रिका धारकांचे आधार बँक खात्याला जोडण्यात हे दोन जिल्हे राज्यात प्रथम

शिधापत्रिका धारकांचे आधारकार्ड बँक खात्याला जोडण्याचे (आधार सिडींग) कार्यक्षेत्रानुसार १०० टक्के कामकाज पूर्ण करण्यात पुणे विभागातील पुणे व सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाने राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे. या यशाबद्दल पुण्याच्या अन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने व पुणे शहर सर्व परिमंडळ अधिकारी तसेच सोलापूरचे अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे …

Read More »

रेशन कार्डावर आता आयोडीनयुक्त मीठ ही मिळणार अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते मुंबईत शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी आहाराची सकसता वाढविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. महिलांमधील अ‍ॅनिमियाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्तभाव दुकानातून शिधापत्रिकेवर ‘लोह आणि आयोडिनयुक्त’(डबल फोर्टीफाईड) मीठ वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत मुंबइ येथे या मीठ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या बुधवारी …

Read More »