Tag Archives: sanjay raut

संजय राऊत यांचा सवाल, आता ते जोडे कोणाला मारणार भाजपा प्रवक्ता की राज्यपालांना?

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदे गट, मनसे आणि भाजपाने राहुल गांधी यांच्यासह शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. तसेच राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. मात्र महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे वक्तव्य भाजपा प्रवक्ते आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. त्यावरून उध्दव …

Read More »

संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल, कुठे गेला आता तुमचा स्वाभिमान?

तीन-चार दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या या टीकेवर राज्यात चांगलेच रणकंदन माजले. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण ऐन थंडीतही चांगलेच तापले. त्यातच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने उध्दव …

Read More »

संजय राऊतांची स्पष्टोक्ती, अन्यथा देशाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता

मागील तीन-चार दिवसांपासून भारत जोडो यात्रे दरम्यान आणि नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा सावरकर यांच्या माफीनाफ्यावरून टीका केल्याने राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करताना थेट पंडित नेहरू यांच्यावर टीका केली. या टीकेला उध्दव ठाकरे गटाचे …

Read More »

संजय राऊत म्हणाले, तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याने देशभरात खळबळ माजली आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेना या मित्र पक्षांची अडचण झाली आहे. आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता होऊ शकते असे स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट संकेत दिले. या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Read More »

अमोल किर्तीकर म्हणाले, मी माझ्या वडीलांना माझा निर्णय सांगत…

शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याचा निर्धार केला आहे. आज सकाळी प्रवक्ते संजय …

Read More »

संजय राऊत घरी आल्यानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, न डगमगता लढतो तोच मित्र

शिवसेनेचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांची काल जामीनावर मुक्तता झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. त्यानंतर आज मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांचे उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी औक्षणही केले. यानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तिघांनीही पत्रकार परिषद घेतली. …

Read More »

संजय राऊत म्हणाले, मी लिहीणारा माणूस दोन पुस्तके लिहीली पण…

मागील तीन महिन्यापासून पत्राचाळ प्रकरणी तुरुंगात राहिलेले उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना काल जामिन मिळाला. त्यानंतर रात्री ६.४५ वाजता त्यांना तुरूंगातून मुक्त करण्यात आले. त्यानंतर आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री येथे जात भेट घेतली. त्यानंतर उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार …

Read More »

भास्कर जाधव म्हणाले, ईडी पुन्हा कोणाच्या कुटुंबाला त्रास देणार नाही

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आता आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित आहे. या निकाला नंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाला निशाणा लक्ष करीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडयला सुरुवात झाली. तर दुसरीकडे न्यायालयाने संजय राऊत यांना केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे ईडीवर ओढल्यानंतर ठाकरे गटाचे नेते …

Read More »

ईडीने मर्जीने आरोपी निवडले का? ; न्यायालयाने ईडीला झापलं

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे विशेष न्यायालयाने ईडीवर ओढत पत्रावाला चाळ प्रकरणात मुख्य आरोपींना अटक करण्याचे सोडून मर्जीने आरोपी निवडले आहेत का? असा सवाल न्यायालयाने ईडीला केला. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए विशेष न्यायालयाने आज संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या …

Read More »

अखेर संजय राऊत, प्रविण राऊत यांना जामीन मंजूरः उच्च न्यायालयाचा नकार ईडीने जामीनासाठी केला विरोध

मागील तीन महिन्यापासून पत्रावाला चाळप्रकरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना आज अखेर पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला. यापूर्वी याप्रकरणी अनेकदा संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र प्रत्येकवेळी जामीन अर्ज फेटाळण्यात येत होता. अखेर संजय राऊत आणि प्रविण …

Read More »