राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झाल्यानंतर एकाबाजूला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच राष्ट्रपती पदासाठी भाजपाच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिल्यानंतर आता खासदार ही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. …
Read More »उध्दव ठाकरे यांना गुलाबराव पाटील यांचा इशारा, १८ पैकी १२ खासदार अनं २२ आमदार… शिवसेना पक्ष आमचा आहे अनं तो पुन्हा उभा करू
शिवसेनेतील बंडखोरीनंतर किमान राहिलेले तरी आपल्या सोबत रहावेत किंवा आहेत की नाहीत या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून झाडून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना भेटून आपली बाजू मांडत त्यांची मते जाणून घेत आहेत. तसेच आपलीच शिवसेना खरी असल्याचे सांगत असतानाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्ष उध्दव ठाकरे यांना …
Read More »संजय राऊत यांचा टोला; २०० जागांची भाषा दिल्लीतील नेत्यांची, राज्यातील नव्हे आमदार संतोष बांगर यांच्या शिंदे गटात जाण्यावर केले भाष्य
गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना परत आणण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या आमदाराने विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत शिवसेनेला मोठा झटका दिला. यापार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. जे आमदार …
Read More »गुलाबराव पाटील म्हणाले; शिवसेना सोडली नाही, पण उठाव केलाय अजित पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर
विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर विधानसभेत अभिनंदन पर प्रस्तावावरील चर्चे दरम्यान शिवसेनेतील बंडखोर आमदार बंडखोरीबाबत काय भूमिका मांडतात याविषयी उत्सुकता लागून राहिली होती. यावेळी अजित पवार यांनी सांगितलेल्या वाक्याचा धागा पकडत बंडखोर आमदार गुलाबराव पाटील …
Read More »सरनाईक गुवाहाटीला गेल्याचा किस्सा सांगण्याऱ्या संजय राऊत यांनी दिली ‘नवी’ माहिती मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती
काही दिवसांपूर्वी दहिसर येथील शिवसेना मेळाव्यात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाषण करताना सांगितले की, मला प्रताप सरनाईक यांचा फोन आला होता. त्यावेळी ते दिल्लीत गेले होते. तेथे सरनाईक आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि फडणवीस यांनी प्रताप सरनाईक यांना थेट अमित शाह यांच्याकडे घेवून गेले. तेथे भेट झाल्यानंतर …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेचा सवाल, याचा अर्थ काय? ट्विट करत केला सवाल
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेत सध्या तरी अनधिकृतरित्या फूट पाडली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी बंडखोर आमदारांना परत बोलविण्याचे सातत्याने आवाहन करण्यात येत असतानाच मागील एक-दोन दिवसांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर टीकेची झोड उठविली. यावरून बंडखोर नेते एकनाथ शिंदे …
Read More »दिपक केसरकर यांचे खुले पत्र: भाजपाची भलामण, संजय राऊतांवर निशाणा हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी... बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा!
बंडखोरांची बाजू मांडण्यासाठी बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी आज खुले पत्र लिहित शिवसेनेसाठी भाजपा कशी चांगली आहे आणि हिंदूत्वाच्या मुद्यावर भाजपाबरोबर एकत्र येणे चांगले (?) यासह भाजपा नेते कसे शिवसेनेवर टीका करत नाही आदींसह अनेक मुद्दे मांडत या सर्वामागे संजय राऊत कसे कट कारस्थानी आहेत याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीकेचा …
Read More »ईडीच्या समन्सनंतर संजय राऊत यांचे आव्हान, मला अटक करा बंडखोरानंतर आता राऊत टार्गेट
राज्यात सत्ता परिवर्तनाच्या उद्देशाने शिवसेनेत एकप्रकारे फूट पाडण्याच्या अनुषंगाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुळ शिवसेनेतील ३९ आमदार आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना घेवून गुवाहाटी येथे तळ ठोकल्याने राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. तसेच राऊत …
Read More »संजय राऊत म्हणाले, म्हणे आता ती चड्डी-बनियन टोळी झाली तानाजी सावंत आणि प्रकाश सुर्वे पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत
शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला ३७ आमदारांसह काही अपक्ष आमदारांनी पाठींबा देत शिंदे गटात सहभागी झाले. सद्यपरिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने त्यांचे विधिमंडळाच्या लढाईत पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, काल म्हणे गुवाहाटीत …
Read More »संजय राऊत यांचे आव्हान; एकनाथ शिंदेंची वेळ संपली, आता आमची वेळ सुरू महाविकास आघाडीचे सरकार मजबूत
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर हे बंड क्षमविण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांना परतण्याचे आवाहन केले. मात्र बंडखोर आमदारांकडून परतीच्या अनुषंगाने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची वेळ संपली …
Read More »
Marathi e-Batmya