मुंबई विद्यापीठातील शिक्षकांची रिक्त पद, महाविद्यालयांचा नामांकनाचा विषय, एमएमआरडीएकडून विद्यापीठ परिसरात रखडलेली विकासकामे आदी मुंबई विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन दरबारी मांडून त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कँम्पस येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिनेट सदस्यांसोबत भेट देऊन विद्यार्थ्यांच्या …
Read More »छ. संभाजीनगरमधील ‘उबाठा’ च्या ५० पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत
छत्रपती संभाजीनगर येथील उद्धव ठाकरे गटाच्या ५० प्रमुख पदाधिका-यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा. डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सचिव किरण पाटील, नवनाथ पडळकर, संभाजीनगर भाजपा जिल्हाध्यक्ष संजय …
Read More »राहुल शेवाळे यांचे वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर, येत्या २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा २३ जानेवारीला मुंबईत सत्कार सोहळा
शिवसेना मंत्री उदय सामंत यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तर देताना राहुल शेवाळे म्हणाले की, उबाठाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक असून येत्या २३ जानेवारी रोजी मोठा राजकीय भूकंप होईल. त्यामुळे धास्तावलेले विरोधक शिवसेनेबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. उदय कोणाचा होणार यावर चर्चा करण्यापेक्षा उबाठा गटाच्या अस्ताबाबत …
Read More »अंबादास दानवे यांची मागणी, खासगी बसेस खरेदी स्थगितीची अधिकृत सूचना काढा भाडेतत्वावरील बस खरेदीच्या नावाखाली सरकारला लुटण्याचा प्रयत्न
राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाकडून १३१० खासगी बसेस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री यांनी स्थगिती देऊन चौकशी करण्याचे वृत्त प्रकाशित झाले असले तरी याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत सूचना काढली नाही. त्यामुळे सरकारने या बसेसच्या स्थगिती व चौकशीबाबत अधिकृत सूचना काढावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. पुढे बोलताना अंबादास …
Read More »नो बॅनर साठी आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध
२०२५ मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आदित्य ठाकरे पुढे लिहिलेल्या …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा नेमका कोणाला टोला, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे अडीच वर्षात कोणी सोडून गेलं नाही- जनतेचा कौल हिसकावून घेण्यात आला
राज्यातील महायुतीला संशयातीत बहुमत मिळविल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा घोळ तब्बल १० दिवस सुरु राहिला. त्यानंतर आज विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाच्या विधिमंडळाच्या गटनेते पदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये आयोजित या बैठकीला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची प्रशासनास इतकी घाई का? दाव्या आधीच निमंत्रण राजभवन आणि राज्यपाल फक्त नावालाच का
संशयातीत बहुमत मिळवून १० दिवस उलटून गेल्यानंतर अखेर विधिमंडळात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाकडून विधिमंडळ पक्षाच्या नेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड आज करण्यात आली. तसेच सत्ता स्थापनेसाठी दुपारी ३ वाजता तिन्ही पक्षाचे नेते राजभवनावर जाणार असल्याची घोषणा भाजपाचे केंद्रीय निरिक्षक विजय रूपानी यांनी जाहिर केले. त्यानुसार अद्याप राजभवनावर तिन्ही …
Read More »प्रविण दरेकर यांची स्पष्टोक्ती, एकनाथ शिंदे आजही पंतप्रधानांचे लाडकेच एकनाथ शिंदे क्षमतावान! मेहेरबानीवर जगणारे नाही
एकनाथ शिंदे आजही पंतप्रधान आणि अमित शाह यांचे लाडकेच आहेत. जेव्हा जेव्हा पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले तेव्हा आपलेपणाची वागणूक दिलीय. अमित शाहनींही भावासारखे त्यांच्यावर प्रेम केलेय. सरकार आणण्यात एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका असल्याचे सगळ्यांना ज्ञात आहे. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचेही भावासारखे प्रेम आणि आपुलकी शिंदेंविषयी …
Read More »शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल मतदारांना पैसे आणि दारू वाटप केल्याप्रकरणी कोपरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
शिवसेना उबाठा गटाचे कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे यांच्यासह उबाठा सेनेच्या ७ जणांवर ठाण्यातील कोपरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे आणि दारू वाटप करताना पोलिसांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात काल रात्री २ वाजता …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, त्यांच मन आणि हृदय रिकामं होतं… मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागात घोटाळा, सरकार आल्यावर चौकशी करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी करत २६-१२-२०२२ एमएमआरडीए MMRDAचे दोन पत्र यावेळी दाखविले. मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंग काम केलं जातय . मेट्रो २अ आणि मेट्रो ७च्या रंगरंगोटीसाठीचा एमएमआरडीए MMRDAने एक पत्र दिलं आहे, त्यानंतर ४ ऑक्टोबर निविदा काढण्यात आली …
Read More »
Marathi e-Batmya