माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते विजय चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते, माध्यम विभाग …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महाराष्ट्राचा गृहविभाग ‘पांडू हवालदार’ चालवतो म्हणूनच अवैध धंदे… कायदा सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती पाहता देवेंद्र फडणवीसांनी प्रायश्चित घ्यावे; पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून खालच्या स्तरापासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत हप्ते पोहचवले जात आहेत. हप्ता वसुलीमुळे पोलीस प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही म्हणूनच राज्यात ड्रग्जचा खुलेआम काळाधंदा सुरु आहे, गांजा विकला जातो, हातभट्ट्या व विषारी दारुने थैमान घातले आहे. या अवैध धंद्यातूनच पुण्यात विषारी दारुने २२ निष्पाप लोकांचे बळी …
Read More »काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट जैन मुनीचे विधान जैन धर्माच्या अहिंसा तत्वाला छेद देणारे, खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर तत्काळ कठोर कारवाई करा,
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे कोणी समर्थन करत असेल तर ते भारतीय संस्कृतीला धरून नाही. अहिंसा हे जैन धर्माचे तत्व आहे, त्यालाच ते छेद देणारे आहे. गांधी हत्येत सात आरोपी होते. त्यातील एक माफीचा साक्षिदार झाला, काहींना शिक्षा झाली. कपूर आयोगाचा अहवाल आहे, दिल्लीच्या लाल किल्ल्यातील न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे. …
Read More »भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली घोषणा
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय कार्यकारणी जाहिर केली होती. त्यानंतर आता प्रदेश प्रवक्त्यांच्या नावांची यादी जाहिर केली. या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक, प्रमोद जठार, अजित …
Read More »भाजपा स्थापना दिन प्रदेश कार्यालयात साजरा सामान्य नागरिकांपर्यंत भाजपाची राष्ट्रीयत्वाची विचारधारा पोहचविणार-रविंद्र चव्हाण यांची माहिती
भारतीय जनता पार्टी-भाजपाची राष्ट्रीयत्वाची विचारधारा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्थापना दिनाच्या निमिताने राज्यभर मंडल स्तरापर्यंत कार्यक्रम होणार आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. भाजपा स्थापना दिनानिमित्त प्रदेश कार्यलयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमावेळी रविंद्र चव्हाण बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. अभिमन्यू पवार, दक्षिण …
Read More »शशिकांत शिंदे यांची हमी, ऑपरेशन तुतारी होणार नाही याची हमी सरकारला शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाही
अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस नुकसानीची भरपाई सरकारकडून अजूनही मिळाली नाही,केंद्राकडून इतर राज्यांना मदत झाली आपल्य राज्याला मदत मिळाली नाही, राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाही, हे आम्हाला सभागृहात दिलेल्या उत्तरातून समजले आहे, एकही मंत्री अवकाळी पाऊस जिथं झाला तिथं गेले नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी …
Read More »काँग्रेस पक्षाची सोमवार ३० मार्चला सुरतगाव ते तुळजापूर ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष यात्रा
काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ आयोजित केली असून सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या संघर्ष यात्रेत पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व शेतकरी सहभागी होणार आहेत. पदयात्रेची सुरुवात सोलापूर तुळजापूर महामार्गावरील सुरतगाव येथून …
Read More »रविंद्र चव्हाण यांची माहिती, नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवड्यात १ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रुग्णांना चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र …
Read More »कल्याण – डोंबिवली , चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत, पालघरचे उबाठा गटातील उपेंद्र पाटील यांचाही भाजपामध्ये प्रवेश
कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर यांच्यासह ७ माजी नगरसेवकांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह उबाठा च्या ९ माजी नगरसेवकांनी तसेच पालघर जिल्ह्यातील उबाठा नेते उपेंद्र पाटील यांनीही याच कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. …
Read More »वसई-विरारच्या ‘बविआ’ च्या माजी नगसेवक आणि कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले सर्वांचे स्वागत
वसई- विरार मधील बहुजन विकास आघाडीचे अनेक वर्षे नगरसेवक राहिलेले महेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा पंडित दुबे, आ. प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ आदी …
Read More »
Marathi e-Batmya