तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देत त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेत शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र आता शिवसेनेत केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र आज …
Read More »उध्दव ठाकरे यांचा सवाल, जे सन्मानाने झालं असते ते घातापाताने का? भाजपासह बंडखोरांवर साधला निशाणा
तसेच ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला गळती लागली असून ठाणे महानगरपालिकेचे एक महिला नगरसेविका वगळता सर्व माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात कायदेशीर लढाई सुरु झाल्याचं बोललं जात असल्याचे सांगण्यात येत असून यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोरासह भाजपाला खोचक सवाल करत जे सन्मानाने …
Read More »उध्दव ठाकरे यांचे बंडखोरांना प्रत्युत्तर, बोलत नसलेले तिथे गेल्याने आता बोलू लागले बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर, संजय राठोड यांच्या वक्तव्यानंतर टीकास्त्र
इतके दिवस जे गप्प होते ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सूरतेला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरं झालं असतं असं म्हटलं होतं. ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती असा …
Read More »एकनाथ शिंदे फेम बंड ब्रिटनमध्येही; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा ४० पेक्षा अधिक मंत्र्यांचे राजीनामे
साधारणत: १२ ते १५ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित मंत्र्यांसह ४० आमदार आणि १० समर्थक आमदारांना घेवून वेगळी चूल मांडली. त्यामुळे राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारला राजीनामा द्यावा लागला. नेमकी काहीसे अशाच प्रकारच्या …
Read More »उध्दव ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेवर राऊत म्हणाले, शिंदेंच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल ट्विट तरी करता येत का ? खोचक सवाल
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील भाषणावर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर पलटवार करताना रिक्षाच्या वेगाने मर्सिडीजला मागे टाकले असा खोचक टोला लगावला होता. या टीकेबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. …
Read More »शिवसेनेला ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही धक्का: एक नगरसेविका मात्र विरोधात ठाणे महापालिकेतील ६६ तर नवी मुंबईतील ३०-३२ जण शिंदे गटात जाणार
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत सेनेतील ४० आमदारांना घेवून स्वतंत्र चूल मांडत मुख्यमंत्री पदाची शपथ घेत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. या बंडाचे पडसाद आता स्थानिक पातळीवर पडत असून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेतील ६७ …
Read More »काय झाडी, काय डोंगार…शहाजी पाटील म्हणाले, शिंदे यांनी गोल कसा केला कळलंच नाही इनसाईड स्टोरी सांगताना केला अनेक गोष्टींचा उलगडा
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये शहाजी पाटील हे सर्वात पुढे होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडापेक्षा सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा कार्यकर्त्याबरोबरील “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” हा डायलॉग चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत गाजला. त्यांच्या या डायलॉगमुळे त्यांची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे. पण …
Read More »उध्दव ठाकरे यांना गुलाबराव पाटील यांचा इशारा, १८ पैकी १२ खासदार अनं २२ आमदार… शिवसेना पक्ष आमचा आहे अनं तो पुन्हा उभा करू
शिवसेनेतील बंडखोरीनंतर किमान राहिलेले तरी आपल्या सोबत रहावेत किंवा आहेत की नाहीत या उद्देशाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून झाडून सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना भेटून आपली बाजू मांडत त्यांची मते जाणून घेत आहेत. तसेच आपलीच शिवसेना खरी असल्याचे सांगत असतानाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्ष उध्दव ठाकरे यांना …
Read More »शिवसेनेचे खासदारही आता उध्दव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटाकडे? राष्ट्रपती पदाच्या भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंना पत्र
राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तब्बल ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. त्यानंतर राज्यात उध्दव ठाकरेंचा गट सोडून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला संसदेतील अनेक खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राज्यात सुरु झालेली असतानाच …
Read More »उध्दव ठाकरे यांच्या माईक हिसकाविण्याच्या टीकेवर फडणवीस म्हणाले, काळजी करू नका आम्ही एकमेकांना देणारे, घेणारे नाही
विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काल विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोलत असताना माईक खेचून घेतला. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देताना नागपूरात पोहोचलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya