हवामान

४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज घाट परिसरातही पावसाचा अंदाज

मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता …

Read More »

जिल्ह्यात २ ते ४ जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय हवामान विभागाच्या ३० जून २०२६ रोजीच्या हवामान बुलेटीननुसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा (Off-shore Trough) सक्रिय असून मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा दरम्यान पसरली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात २ ते ४ जुलैदरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार …

Read More »

पंकजा मुंडे यांची माहिती, प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा चंद्रपूरमधील प्रदुषणाचा मुद्दा भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला त्यास उत्तर देताना दिली माहिती

चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट …

Read More »

१५ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी मान्सून कोकणात दाखल झाला, पण सर्वदूर सक्रिय नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता …

Read More »

जयराम रमेश यांची टीका, तो एक फालतू युक्तीवाद निकोबार जंगलतोडची भरपाई हरियाणामध्ये भरून काढणार

निकोबारमधील जंगलतोड करून हरियाणामध्ये काही प्रमाणात भरपाई म्हणून वृक्षारोपण करून त्याच्या पर्यावरणीय परिणामाचे व्यवस्थापन करता येईल, हा एक फालतू युक्तिवाद आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी शुक्रवारी (५ जून, २०२६) बंगळूरु येथे ‘द हिंदू हडल’चा म्हणून आयोजित ‘अरवली पर्वतरांगांपासून निकोबारपर्यंत: पर्यावरणाच्या उंबरठ्यावर’ या सत्रात बोलताना …

Read More »

मान्सूनचे भारतात आगमन उशीराने होणार, कारणं काय उशीर होण्याला हवामान तज्ञांकडून मान्सूनची तारीख तीन वेळा बदलली

भारताचा नैऋत्य मान्सून, जो आतापर्यंत केरळमध्ये दाखल व्हायला हवा होता, तो उशिरा येत आहे आणि ताज्या अंदाजानुसार तो ३ जूनपूर्वी किनारपट्टीवर पोहोचणार नाही, इतकेच नव्हे तर काही हवामान तज्ज्ञांच्या मते यात आणखी विलंब होऊ शकतो. हवामान तज्ज्ञांना ही तारीख पुढे ढकलण्याची ही तिसरी वेळ आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सुरुवातीला …

Read More »

१० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत …

Read More »

तीव्र उष्णतेच्या झळांच्या पार्श्वभूमीवर पावसाचे आगमन? अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि वायव्य भारतावर ढगं होतायत जमा

भारताचा मोठा भाग तीव्र उष्णतेच्या लाटेने त्रस्त असताना आणि रात्रीच्या वेळीही तापमान असामान्यपणे जास्त असताना, भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या उपग्रह प्रतिमांमधून उत्तर भारताकडे एक मोठी पश्चिमी प्रणाली येत असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे बहुप्रतिक्षित पावसाची आणि या भाजून काढणाऱ्या तापमानापासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. INSAT-3DS हवामान उपग्रहाने …

Read More »

गिरिश महाजन यांची माहिती, ‘भारत फोरकास्ट सिस्टम’चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेसह, महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन क्षमतेत मोठी झेप

अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणाली ‘भारत फोरकास्ट सिस्टम’चा वापर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असून हवामान  पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल. यासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) समवेत करार महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला अधिक बळकट करणारा महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी …

Read More »

उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा अलर्ट सकाळी ११ ते ४.३० वाजेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी नाही, नागपूर व वर्धा जिल्ह्यात १६ ते १८ पर्यंत यलो अलर्ट

हवामान विभागाने विभागातील नागपूर व वर्धा जिल्ह्यात संभाव्य उष्णता लाटेच्या (हीट वेव्ह ) पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, कामगार व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, उष्णतेच्या लाटेची तीव्रता  विभागात नागपूर व वर्धा जिल्ह्यात अधिक …

Read More »