राज्यात मागील तीन दिवसांपासून असलेल्या पावसाने सोमवारी मुंबईसह राज्याला झोडपून काढले. परिणामी पूर स्थितीत निर्माण झाल्याने पाण्यात अडकलेल्या २१३ लोकांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने रेस्क्यू केल्याची माहिती, मंत्रालय आपत्कालीन कक्षाने दिली. तसेच पुढील दोन दिवस हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केल्याचे ही सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन कक्षातील राज्यातील …
Read More »आयएमडीचा इशारा, सप्टेंबर महिन्यात देशात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता मासिक सरासरीच्या १०९ टक्के जास्त पाऊस
सप्टेंबरमध्ये भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशाच्या अनेक भागात आधीच अनेक मुसळधार पावसामुळे झालेल्या आपत्तींचा सामना करणाऱ्या हंगामाचा शेवट होईल, असे भारतीय हवामान विभागाने अर्थात आयएमडी (IMD) रविवारी (३१ ऑगस्ट २०२५) सांगितले. सप्टेंबर २०२५ मध्ये मासिक सरासरी पाऊस १६७.९ मिमी या दीर्घकालीन सरासरीच्या १०९% पेक्षा जास्त होईल …
Read More »पुणे घाट परिसराला ऑरेंज अलर्ट; मागील सात दिवसात २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (National Remote Sensing Centre) या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून SACHET platform चा वापर करून मागील ७ …
Read More »रायगड, पुणे घाट भागात रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांला १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० ते २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० पर्यंत ३.४ ते ४.४ मीटर तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्याला १९ ऑगस्ट रोजीपासून सायं. ५.३० ते २१ ऑगस्ट दुपारी २.३० पर्यंत २.९ ते ४.० मीटर …
Read More »मुंबईसह राज्यात पावसाची दमदार हजेरी, पुढील ४८ तास रेड अलर्ट रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग झाले धीमे, ठिकठिकाणी मुंबईत पाणी साचल्याने वाहतूकीवर परिणाम
मागील तीन दिवसापासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली कायम आहे. मात्र काल रात्रीपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावत आपले अस्तित्व दाखवून दिले.त्यामुळे आज मुंबईसह राज्यातील सर्वच भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाह्यला मिळाले. त्यातच उद्या आणि परवा मुंबईत मुसळधार पाऊस येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, चेंबूर मध्ये …
Read More »राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह या भागात रेड अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून …
Read More »१८-१९ ऑगस्टला कोणत्या भागात कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पाऊस
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ, नदी-नाल्यांना पूर, आणि दरड कोसळण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण …
Read More »मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये आणि घाट परिसरात २४ तासाचा मान्सून रेड अलर्ट पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट
राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात मान्सूनचा रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात मान्सूनचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे …
Read More »रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट हवामान खात्याच्या माहितीच्या आधारे सरकारचा इशारा
रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून …
Read More »पालघर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांसह पुणे घाट परिसरात ‘रेड अलर्ट’ कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
राज्यात पुढील २४ तासासाठी पालघर, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात आणि पुणे घाट परिसरात ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यातील कुंडलिका व सावित्री नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरण ९८ टक्के भरले असून कोळवण नदी …
Read More »
Marathi e-Batmya