४ ते ६ जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज घाट परिसरातही पावसाचा अंदाज

मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916
पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873
ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827
ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101
पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42

About Editor

Check Also

जयराम रमेश यांची टीका, तो एक फालतू युक्तीवाद निकोबार जंगलतोडची भरपाई हरियाणामध्ये भरून काढणार

निकोबारमधील जंगलतोड करून हरियाणामध्ये काही प्रमाणात भरपाई म्हणून वृक्षारोपण करून त्याच्या पर्यावरणीय परिणामाचे व्यवस्थापन करता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *