राज्यात काही जिल्ह्यांना वादळी पाऊस व वीजांचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला महाराष्ट्रातील या जिल्ह्यांसाठी इशारा

मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

११ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

१२ सप्टेंबर रोजी धुळे, नाशिक घाट, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस व विजांची शक्यता आहे.

१३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा घाट, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

१४ सप्टेंबर रोजी नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

About Editor

Check Also

२९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज विदर्भ, उत्तर मराठवाडा, खान्देश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर

बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *