चक्क विरोधी पक्षनेते फडणवीसांना एनकांऊटरच्या धमक्या भाजपाकडून राज्यभरातल्या आयुक्तांना निवेदन

मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात गेले काही दिवस कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असुन यासंबंधीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज राज्यभर पोलिस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
गेले काही दिवस राज्यांत माध्यमांची गळचेपी होत असून, समाज माध्यमांवर सरकार विरोधात व्यक्त होणाऱ्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्याविरोधात असंविधानीक भाषेत टिपणी होत असून, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना थेट एनकाऊंटरच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि राज्यातील जनतेच्या रक्षणासाठी कटीबद्ध असणाऱ्या पोलिसांवरही हल्ले होत आहेत.
ही सर्वच परिस्थिती लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी असुन राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारी आहे. या गंभीर परिस्थिती विरोधात योग्य ती पावले उचलून हे प्रकार लवकरात लवकर थांबावेत यासाठी मुंबई, ठाणे, धुळे या शहरांसोबत राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. याआधी २ मे रोजी सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी भाजपाच्या वतीने असे निवेदन सादर करण्यात आले होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *