मुंबई उपनगरातील बेरोजगारांनों या संकेतस्थळावर नावे नोंदवा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांचे आ‌वाहन

मुंबई : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि मुंबई उपनगर जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी केलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या आधार क्रमांकाची नोंद केलेली नाही. तरी अशा उमेदवारांना आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे, अन्यथा 15 ऑगस्ट नंतर त्यांची नोंदणी रद्द होईल, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर कार्यालयामार्फत कळविण्यात येत आहे.

तरी उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जॉब सिकर ऑप्शनमध्ये नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून आधार क्रमांक तथा नोंदणी अद्यावत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई उपनगर यांनी केले आहे.

About Editor

Check Also

शिवरायांच्या ऐतिहासिक वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ शस्त्रप्रदर्शनाचा चौथा टप्पा मुंबईत दुर्मिळ मराठा शस्त्रांचा ठेवा पाहण्याची संधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेली ऐतिहासिक वाघनखे आणि मराठा साम्राज्याच्या शौर्यपरंपरेची साक्ष देणाऱ्या दुर्मिळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *