मराठीतील या दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम

मुंबई : प्रतिनिधी

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश आहे. या कलाकारांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचा सांस्कृतिक सेल अधिक मजबूत होणार आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,आमदार अमोल मिटकरी, पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, चिटणीस संजय बोरगे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणी नवी ट्विस्टः हल्लेखोरापैकी एक जण अल्पवयीन हल्लेखोराकडूनच अल्पवयीन असल्याचा दावा

जुहू येथे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबाराप्रकरणी अटक करण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *