अंधेरी पोटनिवडणूकः भाजपाच्या उमेदवारासह ७ जणांचे अर्ज मागे, ७ अद्यापही रिंगणात

अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणूकीत आज भाजपाने जाहिर केल्याप्रमाणे ऋतुजा लटके यांच्या विरोधातील भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांच्यासह इतर ७ उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्यासह ७ जणांमध्ये आता निवडणूक होणार आहे.
अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. आज १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार आज दुपारी ३ वाजेपर्यंत सदर १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.
अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे :

१. निकोलस अल्मेडा (अपक्ष)

२.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)

३. साकिब जफर ईमाम मल्लिक (अपक्ष)

४. राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

५. चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

६. पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

७. चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

अंतिम लढतीसाठीचे उमेदवार :

१. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)

३. मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

४. नीना खेडेकर (अपक्ष)

५. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

६. मिलिंद कांबळे (अपक्ष)

७. राजेश त्रिपाठी (अपक्ष)

मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी ‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाच्या दि. ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

About Editor

Check Also

मुंबईत मेट्रोच्या पिलर्सचा भाग कोसळून अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी कारचे नुकसान, नुकसान आणि अपघाताची नुकसान भरपाई एमएमआरडीए देणार

मुंबईतील मुलुंड येथे शनिवारी दुपारी बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा एक भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *