देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी सत्ताधारी भाजपा आमदारांची मागणी फडणवीस यांच्याकडून मान्य

बॉलीवूड अभिनेता स्व.सुशांतसिंग राजपूत याची व्यवस्थापिका असलेल्या दिशा सालियन हीच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेनेवर शेकविण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र आज फोन टॅपिंगप्रकरण उचलून धरल्याने त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून दिशा सालियन प्रकरण अचानक काढत आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी लावून धरत गोंधळही घातला. त्यामुळे अखेर याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आमदारांच्या मागणीनुसार एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

विधानसभेत आज गुरूवारी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरले. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याच मुद्यावर चर्चेची मागणी लावून धरली. मात्र विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.

त्यानंतर सत्ताधारी बाकावरील शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी पुर्नचौकशीची मागणी केली. तर भाजपाच्या सदस्यांनी एसआयटीची चौकशीची मागणी करत गोंधळ घातला. त्यामुळे पाचहून अधिकवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. त्यामुळे अखेर सभागृहात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलविण्यात आले.

यावेळी देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, दिशा सालियन प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच आहे. सदस्यांनी मागणी केल्याप्रमाणे या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्यात येणार आहे. तसेच याप्रकरणी आणखी कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांकडे सादर करावेत असे आवाहन केले.

यावेळी फडणवीस यांच्या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे प्रकरण राजकिय पध्दतीने हाताळू नये अशी मागणी केली.
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास कोणताही राजकिय अभिनिवेश न ठेवता करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.

About Editor

Check Also

नाना पटोले यांचा इशारा, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रकरण लवकरच उघड भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर

भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *