अजित पवारांचा टोला, सोयीचे आहे ते चालतंय बाकीचं आमच्यावर द्या ढकलून, वाह रे पठ्ठे अब्दुल सत्तार प्रकरणी भाजपाला अजित पवारांचा टोला

नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारमधील विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी नियमबाह्य पध्दतीने गायरान जमिनचे वाटप केले. त्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढत सत्तार यांचा निर्णय रद्दबातल ठरविला. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावावर बोलत होते. त्यावेळी भाजपाच्या एका सदस्यांने अब्दुल सत्तार तुमच्याच काळात राज्यमंत्री होते अशी खोचक आठवण करून दिली. त्यावरून अजित पवार यांनी भाजपाच्या आमदाराला चांगलाच टोला लगावला.

विधानसभेत अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर उच्च न्यायालयाने फटकारल्याचा मुद्दा उपस्थित करत बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी मध्येच भाजपाच्या एका सदस्याने अब्दुल सत्तार तुमच्याच राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते अशी आठवण करून दिली.

त्यावर अजित पवार हे बोलता बोलता थांबले म्हणाले, होय अब्दुल सत्तार आमच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. मात्र आमच्याच मंत्रिमंडळात मंत्री असलेले एकनाथ शिंदे तुम्हाला मंत्री म्हणून कसे चालतात असा खोचक सवाल भाजपा आमदाराला केला.

तसेच जे सोयीचे आहे ते तुम्हाला चालतंय अनं जे सोयीचे नाही ते द्या आमच्यावर ढकलून, वाह रे पठ्ठे अशी मिश्किल टीपण्णीही अजित पवार यांनी त्या आमदाराच्या वक्तव्यावर केली.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *