उच्च न्यायालयाचे आदेशः ईडी चौकशीची मागणी करणाऱ्या सोमय्यांचीच चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे आदेश

मागील काही वर्षापासून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ईडी चौकशीची मागणी करतात आणि या यंत्रणेकडून लगेच चौकशीही सुरु होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच, राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली असल्याचा, आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला. या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान, उच्च न्यायालयाने याप्रकरणी किरीट सोमय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

तत्पूर्वी गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान हसन मुश्रीफ यांचे वकील आबाद पोंडा यांनी यासंदर्भात जोरदार युक्तिवाद करत सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. ते तक्रार करतात आणि त्यानंतर ईडी कारवाई करते. हे केवळ राजकीय षड्यंत्र आहे, असा दावा पोंडा यांनी केला होता. दरम्यान, आज याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने मुश्रीफ यांना दिलासा देत किरीट सोमय्या यांच्या न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्रीफ यांच्यावर किरीट सोमय्या यांनी खोट्या कंपन्यांच्या माध्यमातून स्वतःचा काळा पैसा साखर कारखाना उद्योगात गुंतविल्याचा आरोप केला. तसेच तीच रक्कम कर्ज स्वरूपात दाखविल्याचा आरोपही केला होता. या प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ईडीने अलीकडेच छापेमारी केली होती. तसेच त्यांच्या विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा पाठी लावण्यासाठी माझ्याविरोधाच ‘हेतुपुरस्सर’ गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. तसेच हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिकाही त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. माझ्यावर दाखल झालेला गुन्हा ‘राजकीय हेतुने प्रेरित षडयंत्र’ आहे. मागील सहा ते सात महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता आपल्याला ईडी प्रकरणांमध्ये अडकवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी हा सगळा घाट घातला जात असल्याचा दावा मुश्रीफ यांनी याचिकेद्वारे केला होता.

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची मुंबईत भेट भारत-फ्रान्स व्यावसायिक संबध वृद्धींगत करण्याच्या अनुषंगाने चर्चा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१६ फेब्रुवारी २०२६) मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *