शिंदे-फडणवीसांच्या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ मविआकडून “भ्रमाचा भोपळा” आंदोलन बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; घोषणांनी विधान भवनाचा परिसर दणाणला

बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली.

राष्ट्रवादीचे आमदार भोपळा डोक्यावर घेऊनच शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर पायर्‍यांवर आंदोलन केले.

About Editor

Check Also

संसद परिसरातील नाटकात पूजारी झालेले खासदार पप्पू यादव यांच्यावर दिल्लीत हल्ला आधी चप्पल भिरकावली आणि नंतर चाकूने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

बिहारच्या पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना दिल्लीत एका पत्रकार परिषदेदरम्यान एका व्यक्तीने चप्पल फेकल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *