प्रताप सरनाईक म्हणाले,… शिंदे-फडणवीस दिलेला शब्द पाळतात मंत्री पदाचा शब्द दिलाय

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे की, तुम्हाला मंत्रीपद दिलं जाईल, असा दावा प्रताप सरनाईक यांनी केला. तसेच शिंदे-फडणवीस दिलेला शब्द पाळतात, असंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी २३ मे रोजी मुंबईत माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

प्रताप सरनाईक म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मंत्रीपदाचा शब्द दिला आहे. ते दिलेला शब्द पाळतात. आजपर्यंतचा तसा इतिहास आहे. आम्हाला कोट शिवायला टाकायची गरज नाही. एकनाथ शिंदे आम्हाला कोटासह मंत्रीपद देतील. लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं त्यांनी सांगितलं आहे. कालही त्यांनी याबाबत सांगितलं आहे.

थोडी फार संकटं होती तीही दूर झाली आहेत. त्यामुळे आता फक्त महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विकास करण्यासाठी या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. ते नक्कीच मंत्रीमंडळ विस्तार करतील, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांचे निर्देश, स्मार्ट प्रकल्पांना बांधकाम मंजुरी व फायर ‘एनओसी’बाबत तातडीने कार्यवाही करा आढावा बैठकीत दिले निर्देश

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध उपप्रकल्पांना बांधकाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *