थलापती विजयचा ‘लियो’ ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज; वाचा कधी आणि कुठे ?

थलापती विजयचा ‘लियो’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘लियो’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाकडे विजयचे चाहते डोळे लावून बसले आहेत.

मात्र आता विजयच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. विजयचा ‘लियो’ हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘लियो’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. स्ट्रीमिंग अपडेट्स या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमधून ‘लियो’ या चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट समोर आली आहे. ‘लियो’ हा चित्रपट 21 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे.

अवघ्या ६ दिवसांत विजयच्या चित्रपटाने ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. लिओ हा विजयच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘लियो’च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, विजय या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला आहे. तर संजय दत्तने खलनायकाची भूमिका साकारली आहे. याशिवाय त्रिशा कृष्णन, अर्जुन सर्जा आणि प्रिया आनंद देखील या चित्रपटाचा भाग आहेत.

About Marathi E Batmya

Check Also

Mohe-Lagi-Lagan-SUN-Neo

सन निओची नवीन सादरीकरण, “मोहे लागी लगन”, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल ज्योतिष आणि वास्तू दोषावर आधारीत मार्गदर्शन करणारी सिरीयल

सन निओ त्यांच्या प्रेक्षकांना “मोहे लागी लगन” हा शो घेऊन येत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी भावना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *