शरद पवार यांचा इशारा, ….भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद आजही

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सत्ताकारणात अंतिम शब्द टाकणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्यातील खेळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीचे उद्घटन करताना शरद पवार यांनी जाहिररित्या इशारा दिला. मात्र तो इशारा नेमका त्यांचे पुतणे अजित पवार यांना की भाजपाच्या नेत्यांना दिला यावरून राज्यातील राजकिय जाणकारांना प्रश्न पडला आहे.

शरद पवार यांनी सभेत बोलताना म्हणाले, मी अजून म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे, तुम्हा लोकांबद्दल माझी एक तक्रार आहे. ती तक्रार अशी आहे की, तुम्ही तुमच्या सगळ्या भाषणांमध्ये मी ८४ वर्षांचा झालो, मी ८३ वर्षांचा झालो, असा उल्लेख करता. पण तुम्ही माझं काय बघितलंय. मी काही अजून म्हातारा झालो नाही अशी मिश्किल टीपण्णीही केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, लय भारी लोकांनासुद्धा सरळ करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तुम्ही काही चिंता करू नका. तुमचं जे काही दुखणं असेल ते सगळं दुखणं दूर करण्यासाठी जे करायला लागेल? ते सगळं करू आणि नवीन इतिहास घडवू, असा विश्वासही यावेळी उपस्थितांना दिला.

दरम्यान, शरद पवार यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांचे पुतणे अजित पवार यांचे राजकिय उंची आणि वजन वाढविल्याची चर्चा आजही वेगवेगळ्या पध्दतीने चर्चिली जात आहे. तसेच देशातील सर्वपक्षिय नेत्यांशी आणि उद्योजकांशी असलेले संबध सर्वांना माहित आहेत. तरीही शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनीच आपल्याच काकाच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत भाजपाशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पद मिळविले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिलेला इशारा नेमका अजित पवार यांना की भाजपाला असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित वसतिगृहांची संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबरपर्यंत सोयीस्कर जागांचे प्रस्ताव पाठवावेत

आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, मराठा तसेच सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहांऐवजी भविष्यात एकाच ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *