अरविंद केजरीवाल यांनी जाहिर केली १० आश्वासनांची हमी

सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जून रोजी पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी तिहार तुरुंगातून बाहेर पडताच मी पुन्हा आलो, आम आदमी पार्टीला भाजपाकडून चिरडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोपही केला. त्यानंतर आता पाचव्या टप्प्यात दिल्लीत लोकसभा निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया पाडण्यात येणार आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १० आश्वासनांची हमी जनतेला दिली.

काँग्रेसने आपला जाहिरनामा जाहिर नामा प्रसिद्ध करताना देशातील सर्व वर्गाचा विचार करून प्रमुख अशा १० प्रश्नांवर देशातील जनतेला हमी दिली. त्याच पध्दतीने अरविंद केजरीवाल यांनी देशासाठी १० हमींची घोषणा केली ज्यात २४x७ वीज, चांगल्या शाळा, उत्तम आरोग्य पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांसाठी एमएसपी, अग्निवीर योजना बंद करणे, भ्रष्टाचार संपवण्यासाठी भाजपाचे “वॉशिंग मशीन” नष्ट करणे आणि, २ कोटी नोकऱ्या आदी १२ आश्वासने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पार्टीच्यावतीने आयोजित पहिल्याच पत्रकार परिषदेत दिली.

त्यात दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या आश्वासनाचाही समावेश आहे.

यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, मला पंतप्रधान व्हायचे नाही पण माझी हमी आहे की जेव्हा भारत आघाडी सरकार स्थापन करेल तेव्हा मी ही आश्वासने पूर्ण होतील याची खात्री करेन असेही यावेळी सांगितले.
इंडिया ब्लॉकच्या भागीदारांशी या हमींवर चर्चा केली आहे का असे विचारले असता, अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांना वेळ मिळाला नाही, परंतु ते आक्षेप घेणार नाहीत असा विश्वास आहे.

“केजरीवालची हमी हा एक ब्रँड आहे कारण आम्ही दिल्ली आणि पंजाबमध्ये मोदींच्या गॅरंटीपेक्षा वेगळे काम केले आहे,” असेही अरविंद केजरीवाल यांनी दिला.

अरविंद केजरीवाल यांनी भाजपामधील ७५ वर्षांच्या निवृत्तीच्या वयाचा नियम समोर आणत आणि पंतप्रधान मोदी यावर गप्प का आहेत, असा सवाल करत त्यांच्या पक्षातील इतर सदस्य विधाने करत आहेत, “२०१४ मध्ये त्यांनी एल.के. अडवाणी यांना निवृत्त करण्यासाठी जो नियम बनवला होता तो आहे का? त्यांना अर्ज करतात की नाही? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांची माहिती, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार, ‘मिसिंग लिंक’: १ मेला उद्घाटन घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक; वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *