मागील काही वर्षात पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात एकमेकांपासून खूप दर गेले. मात्र मध्यंतरी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडूण गेल्याने ही कटूता कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे स्थानिक पातळीवर पुन्हा येण्यास सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा राज्यस्तरीय पातळीवर एकत्र आले. ते ही एक कारण या चुत भाऊ-बहिणीच्या एकत्र येण्याला आहे. भगवान गडावरील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे हे उपस्थित राहिले. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये एक वेळाच उत्साह पाह्यला मिळत होता.
यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आम्ही जाहिररित्या पहिल्यांदाच एकत्रित आल्याने अनेकांना अडचण वाटत असेल. मात्र पंकजा मुंडे यांना जो वारसा मिळालेला आहे, मुंडे साहेबांच्या माध्यमातून तो वारसा पवित्र वारसा आहे. त्या पवित्र वाऱशाचे महत्व कमी होऊ नये असे मला वाटते. त्यामुळेच जरी मी वेगळा होतो, तरी स्वतंत्र दसरा मेळावा घेण्याचा मनात कधी विचार केला नाही असे सांगत पंकजा मुंडे यांनी सुरु केलेला लढा हा काही त्यांच्या स्वतःसाठी नाही तर इथे जमलेल्या तुम्हा सर्वांसाठीचा असल्याचेही यावेळी सांगितले.
तर पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की, मी गोपीनाथ की बेटी हूँ, असे सांगत ज्या आणखी कोणाची मी लेक असावे असे वाटत असेल तर या भगवान बाबाची मी लेक आहे. या वेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे चिरंजीवाला मंचावर बोलवित म्हणाल्या की, या तुम्ही ओळखलात का हा माझा मुलगा पण मी यालाही सांगितले आहे की, माझे तु मुलगा असला तरी तुझ्यापेक्षा जास्त प्रेम आणि काळजी ही समोर जमलेल्या जनसमुदायावर आहे. त्यांच्या हितासाठी आणि कल्याणासाठीच माझा सर्वाधिक वेळ असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी लोकसभा निवडणूकीत पराभूत झाले. परंतु मी थांबले, थकले नाही. मी तुम्हा सगळ्यांच्यासाठी सतत काम करत राहणार असेही यावेळी सांगितले. मध्यंतरी पक्षातून मला धोका झाला, माझ्यावर १२ कोटी रूपयांसाठी आयकर विभागाची धाड पडली. पण त्या १२ कोटी रूपयांपेक्षा ही समोर जमलेली गर्दी त्यापेक्षा कैक मोलाची असल्याचे सांगत मी तुम्हा सर्वांसाठी लवकरच राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार असल्याचे सांगायलाही यावेळी विसरले नाही.
पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की, मी हेलिकॉप्टरने येथे येते. ते केवळ तुम्हा सर्वांना मी हेलिकॉप्टरने येते याचा अभिमान वाटतो म्हणून हेलिकॉप्टरने येत असल्याचे सांगत मला गोपीनाथ मुंडे यांचे एक वाक्य आठवते, की मला भगवान गडावरून दिल्ली दिसत नाही, मुंबई दिसत नाही, मला पंकजा मुंडे दिसते. या वाक्यातून त्यांनी मला संदेश दिला. मला आयुष्यात काही करता आले नाही, तरी मी एक भगवान भक्तीगड उभा केल्याचे सांगत गोपीनाथ मुंडे यांचा शब्द पुर्ण करून दाखवल्याचे सांगितले.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी तुम्हाला साष्टांग नमस्कार का घालते, कारण माझ्या वडीलांनी तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकली आहे. मी निवडणूकीत विजयी झाले तुम्ही मला मान दिलात, पराभूत झाल्यानंतर तुम्ही मला त्याहून आणखी मान दिलात. आता तुम्हा सर्वांना मान देण्यासाठी गावागावात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार असून आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही असा सवालही यावेळी केला.
शेवटी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझा पराभव झाल्यामुळे मी थकले आहे. पण मी सांगते घोडा-मैदान लांब नाही. धनंजय मुंडे यांना परळीतून आमदार करणारच आहोत असे सांगत राज्यातील वंचितांना जर त्रास दिला तर त्याचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya