मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या ४५ उमेदवारांच्या यादीत पत्नी, मुलगा, भाऊ यांना उमेदवारी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, रविंद्र वायकर यांच्या पत्नी, अनिल बाबर यांच्या मुलाला तिकीट,

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरूपुष्यामृत दिवसाचे औचित्य साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उमेदवार यादी काल रात्री उशीराने जाहिर करण्यात आली. या उमेदवारी यादीत पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नावासह ४५ जणांची पहिली यादी जाहिर करण्यात आली. मात्र या यादीत एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ बालाजी किणीकर यांना मात्र भाजपाच्या सल्ल्यानुसार उमेदवारी अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही.

भाजपाने जाहिर केलेल्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांची उमेदवारी नाकारण्यात आली असून सदर उमेदवाराऐवजी त्यांच्या घरातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उलट शिंदे गटाने यापूर्वी लोकसभा निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या घराच्या पत्नी, मुलाला उमेदवारी दिली. याशिवाय मंत्र्यांचा बंधू म्हणून शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी दिल्याची बाब पुढे आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने विद्यमान आमदारांसह मंत्र्यांना संधी दिली आहे. मात्र रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर सांगलीतील खानापुरचे आमदार अनिल बाबर यांच्या मृत्यूमुळे त्यांचे सुपुत्र सुहास अनिल बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे मंत्री डॉ तानाजी सावंत यांना परांडा मतदार संघातून, पाटण तालुक्यातून शंभूराज देसाई यांना, रत्नागिरीतून उदय सामंत यांना तर त्यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आली. तसेच सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, दिग्रसमधून संजय राठोड, सावंतवाडीतून दीपक केसरकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्याचबरोबर संदिपान भूमरे हे लोकसभेवर गेल्याने त्यांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र विलास संदिपान भूमरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तसेच अमरावतीतील दर्यापूर मतदारसंघातून आनंदराव अडसूळ यांचे सुपुत्र अभिजीत आनंदराव अडसूळ यांना उमेदवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून जाहिर करण्यात आली.

About Editor

Check Also

चंद्रकांत पाटील यांचे आदेश, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा शैक्षणिक नुकसान खपवून घेणार नाही

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *