आता अजित पवार यांचे, मिळणाराय मिळणाराय, येणाराय येणाराय देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईन, पुन्हा येईनच्या धर्तीवर बारामतीत केली घोषणा

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर त्यावेळचे विरोधी पक्षनेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला. त्यानंतर वर्षे-दोन वर्षात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात देवेंद्र फडणवीस हे यशस्वीही झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी होय मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून परत आलो असेही नंतर जाहिर केले. अगदी त्याचधर्तीवर देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची आठवण करून देणाऱ्या या वक्तव्ये आज बारामतीत चौकसभेत बोलताना अजित पवार यांनी चांगेले पद मिळणाराय, मिळणाराय मिळणारायचा तीन वेळा नारा लगावला. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार पुतण्या युगेंद्र पवार यांच्या विरोधात पुन्हा निवडूण येणार येणार येणार असा धोषा लावला. त्यामुळे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचे चांगलेच पाठांतर आणि कॉपी केली काय असा प्रश्न स्थानिक मतदारांबरोबर राजकिय वर्तुळातील जाणकारांना पडला आहे.

बारामतीतील लोकसभा निवडणूकीत बारामतीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या तथा पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल दिला. तर अजित पवार यांच्या अर्धागिंनी सुनेत्रा पवार यांना पराभूत व्हावे लागले. आता त्या मागच्या दाराने राज्यसभेत खासदार आहेत. आता पुन्हा त्या गोष्टीची पुनरुक्ती होऊ नये म्हणून अजित पवार यांनी यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्यांच्याचे पुतणे युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दस्तुर खुद्द शरद पवार यांनी उमेदवारी जाहिर केली. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास स्वतः हजरही यावेळी साहिले.

त्यामुळे राज्यातील काका-पुतण्याचा अंकही या निवडणूकीतही कायम राहिल्याने बारामतीची विधानसभा निवडणूकीत कोण बाजी मारणार याची चर्चा बारामतीसह राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. तसेच राजकिय प्रथेनुसार पुतण्या काकाला धडा शिकविणार की काका पुतण्यावर मात करणार यावरूनही विविध तर्क-वितर्क लढविले जात आहे.

दरम्यान, बारामतीतील झरगरवाडीत अजित पवार हे प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपला विजय पक्का असल्याचे सांगत मागचं झालं गेलं ते गंगेला मिळालं. या निवडणूकीच्या निमित्ताने बारामती तालुक्याचा फायदा होण्याच्या दृष्टीने उद्या काहीही झालं तरी राज्यात महायुतीच सरकार येणार येणार येणार असे सागंत सरकार स्थापन झाल्यानंतर तिथे चांगलं पद मिळणार मिळणार मिळणार असं विधान केले.

अजित पवार यांच्या या विधानाचा संदर्भ थेट देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन या विधानाशी लावला जात आहे. त्याचप्रकारे अजित पवार यांचे विधान असल्याचा तर्क लावला जात आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक रंगतदार आणि चुरसीची होणार असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यातील अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्यासंदर्भात स्वतः पहिल्यांदाच वक्तव्य केले. तसेच त्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी स्व. आर आर पाटील यांच्यावर खापर फोडत देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यावेळी जिंतेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, अजित पवार यांना आता देवेंद्र फडणवीस यांचे खरे वाटणारच. कारण आता ते फडणवीस यांच्या मांडीवर बसल्याची खोचक टीकाही केली होती.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, SIR च्या माध्यमातून ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बुथनिहाय प्रसिद्ध करा, दावे व हरकतीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून, त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *