वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज अँजीओग्राफी आणि अँजीओल्पास्टी शस्त्रकियेनंतर आज डिस्जार्ज दिला

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी अशा सर्जरी पुण्यातील एका रुग्णालयात करण्यात आल्या. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजीओप्लास्टी नंतरची काळजी घेण्यासाठी आणि लवकरात लवकर बरे होण्यासाठी बाळासाहेबांना एका वेलनेस सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील ४-५ दिवसांत बाळासाहेब आंबेडकर हे विधानसभा निवडणूक प्रचाराला येणार असल्याचेही वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.

गुरुवारी ३१ ऑक्टोबरच्या पहाटे त्यांना छातीत दुखू लागल्याने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी होऊन आज बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

About Editor

Check Also

नेहरू जयंती, बालदिन व दिवाळीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य कविता स्पर्धेचे आयोजन १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी होणार कार्यक्रम

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती, बालदिन आणि दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *