नेहरू जयंती, बालदिन व दिवाळीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य कविता स्पर्धेचे आयोजन १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी होणार कार्यक्रम

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती, बालदिन आणि दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत दादर येथील टिळक भवन येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचा विषय ‘सामाजिक व राजकीय’ असा असून, स्पर्धकांना सामाजिक आणि राजकीय विषयांवरील कविता सादर करता येणार आहेत. मराठी, हिंदी भाषेत कविता सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. कवितेच्या सादरीकरणासाठी वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ५,००१ रुपये, द्वितीय क्रमांकाला ३,००१ रुपये आणि तृतीय क्रमांकाला २,००१ रुपये रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

साहित्य, कविता आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणणे, तसेच नवोदित कवींना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या स्पर्धेत कवी, साहित्यप्रेमी आणि नवोदित कवींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केले आहे.

About Editor

Check Also

शेतीच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली शेतातील पिकांची पाहणी सोनेगाव रिठी व कोहळी येथील शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *