निवडणूक आयोगाकडून पोलिस महासंचालक पदी संजय वर्मा यांची नियुक्ती रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर केली नियुक्ती

काँग्रेस महाविकास आघाडीकडून राज्याच्या पोलिस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार उशीरा का होईना निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविले. तसे आदेश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नव्या नावाची घोषणा करण्यासंदर्भात तीन आयपीएस अधिकाऱ्यांची सादर करण्याचे आदेश राज्याच्या गृहविभागाला दिले. त्यातून राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर १९९० च्या आयपीएस बॅचचे अधिकारी संजय वर्मा यांची करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने जाहिर केले.

आयपीएस अधिकारी संजीव वर्मा यांची नियुक्ती जाहिर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या माध्यमातून तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडून मागविण्यात आली होती. त्यानुसार तीन अधिकाऱ्यांची नावे राज्याच्या गृहविभागाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठिवली. त्यानंतर तीन नावांपैकी १९९० च्या बँचचे आयपीएस अधिकारी संजीव वर्मा यांची निवड केंद्रीय निवडूक आयोगाने केली.

दरम्यान, संजीव वर्मा यांच्या जवळपास दोन वर्षाचा कार्यकाळ मिळणार असून एप्रिल २०२८ ला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे संजीव वर्मा यांना जवळपास चार वर्षाचा कालावधी मिळणार आहे. संजीव वर्मा सध्या पोलिस प्रशासनातील फॉरेन्सिक लॅबचे डिजी आणि टेक्निकल या पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे राज्यातील सर्व न्यायवैद्यकीय अर्थात फॉरेन्सिक लॅबचा चार्ज आहे.

केंद्रीय निवडणूुक आयोगाने संजय वर्मा यांच्या नियुक्तीबाबत जारी केलेले आदेशः

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अशोक नगरमधील डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेले मृत्यू ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी कुर्ला पश्चिम आणि घाटकोपर पश्चिममधील धोकादायक भागांचे ऑडिट करून संरक्षक भिंत बांधण्याची मागणी एप्रिलमध्ये करूनही बीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष

कुर्ला पश्चिमेतील अशोकनगर येथे डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *