विधानसभा निवडणूकीत सोलापूरातील मारकरवाडी गावी ईव्हीएम मशिन्सच्या माध्यमातून भाजपाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांवर संशय घेत ईव्हीएम मशिन्सच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची घोषणा केली. परंतु प्रशासनाने त्यास विरोध करत बॅलेटवर मतदान घेण्यास विरोध केला. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी याबाबत भाष्य करताना मिळालेल्या मतांची संख्या आणि विजय मिळविलेल्या जागांची संख्या याबाबत आश्चर्य व्यक्त केले. त्यावर भाजपाचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक्सवर पोस्ट करत टीका करत शरद पवार यांना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस आपल्या एक्सवरील पोस्टवर म्हणाले की, शरद पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात. किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका असे आवाहन करत जास्त मतं मिळून जागा कशा कमी या शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना लोकसभा निवडणूकीत भाजपाला आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांची आकडेवारीच जाहीर केली.
लोकसभा निवडणूकीतील मतांबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत काय झाले ते बघू, भाजपाला महाराष्ट्रात एकूण मतं १, ४९,१३,९१४ इतकी मतं मिळाली. आणि जागा फक्त ९ मिळाल्या. पण काँग्रेसला मत मिळाली ९६,४१, ५८६ इतकी मतं मिळाली आणि जागा १३ मिळाल्याचे सांगितले.
पुढे मतांचे गणित मांडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनेला ७३ लाख ७७ हजार ६७४ मतं आणि ७ जागा मिळाल्या. शरद पवार यांच्या गटाला ५८ लाख ५१ हजार १६६ मतं मिळाली आणि ८ जागा मिळाल्या.
लोकसभेच्या मतांचे उदाहरण पहायचे झाल्यास देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला ८७ लाख ९२ हजार २३७ मतं मिळाली आणि जागा १ मिळाली. तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३ लाख ८७ हजार ३६३ मतं मिळाली ४ जागा मिळाल्याचेही यावेळी सांगत पराभव स्विकाराल तर यातून लवकर बाहेर याल असे सांगत तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षाही ही यावेळी व्यक्त केली.
श्री शरद पवार साहेब, @PawarSpeaks
आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?
चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू,
भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13.
शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2024
Marathi e-Batmya