होळी उत्सवाच्या दरम्यान राजापूरात घडले काय? आ निलेश राणे यांनी केले आवाहन मस्जिदीचे गेट तोडून काही समाजकंटकाकडून सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न

कोकणातील शिमगा अर्थात होळी सणाच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा केला जातो. तसेच स्थानिक ग्रामदैवताच्या पालक्याही फिरवत त्याची मिळवणूकही काढली जाते. कार रात्री शिमगा उत्सवाच्या निमित्ताने ग्रामदेवतेचे पालखीच्या मिरवणूकीच्या रस्त्यावर असलेल्या एका मस्जिदीतचे बंद असललेले गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत कोकणात आणि राजापूरात जी काही घटना घडली त्या आडून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र असा जर कोणी प्रयत्न करत असेल तर मी रस्त्यावर उभा असेन असे आवाहन केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरात शिमगा सणाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या एका मिरवणूकीत स्थानिक भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यावेळी मस्जिदीत तरावीही ची नमाज अदा केली जात होती. त्यावेळी काही समाजकंटकांनी मस्जिदीचे गेट तोडून मस्जिदीत प्रवेश केला. आणि मस्जिदीच्या भिंतीवर रंग लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तैनात असलेल्या पोलिसांनी या समाज कंटकाना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजकंटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांनाचे बळ कमी झाल्याचे दिसून येत होते. परंतु परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात अखेर पोलिसांना यश आले.

यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आणि एका युटुब्य चॅनरवर या घटनेचा व्हिडीओ प्रसारीत करण्यात आला. त्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी एक्सवर एक आवाहन वजा व्हिडीओ जारी केला आहे. त्यामध्ये कोकण पेटला, धार्मिक वाद अशा संदर्भातील लिखाण असलेले व्हिडिओ काही पत्रकारांच्या हँण्डलवरून युट्युब चॅनेलवरून प्रसारीत करण्यात आले. मात्र आता राजापूर पेटले, कोकणही पेटणार वगैरे असे काही भाकित वर्तविण्यात आले. त्यांना माझे एकच सांगणे आहे की, राजापूर आणि तळकोकण पेटले असे जर कोणी म्हणत असेल तर त्यांना माझे एकच सांगणे आहे की, असे काही होऊ देणार नाही. जोपर्यंत आम्ही आहोत. तोपर्यंत असे काही घडणार नाही. तर तशीच परिस्थिती निर्माण झाली तर शांततेसाठी सर्वात आधी मी रस्त्यावर असेन असे सांगत समाजकंटकांना इशारा दिला.

About Editor

Check Also

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश, ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ उभारणीस गती द्या; गुणवत्तेत तडजोड नको डॉ बाबासाहेब बेडकर यांचा ७५ फुटाचा पुतळा उभारणार

लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ (Statue of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *