अखेर माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठा विजय मिळवित पुन्हा एकदा राज्यात सत्तास्थानी विराजमान झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात राजकिय वादाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र काल रात्री उशीरा झालेल्या राजकिय घडामोडीनंतर छगन भुजबळ यांचा पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्री पदाची शपथ दिली.

या छोट्याशी शपथविधी सोहळ्यासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी छगन भुजबळ  यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग ,मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावे, क्रिडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कौशल्य विकास, रोजगार  उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे,तसेच मंत्री  छगन भुजबळ यांचे कुटूंबीय यावेळी उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

About Editor

Check Also

सिंचन प्रकल्पांसाठी साडेसात हजार कोटींचे कर्जास मंत्रिमंडळाची मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून साडेसात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *