रेव्ह पार्टी प्रकरणी प्राजल खेवलकर अटकेनंतर अजित पवार म्हणाले, कोणीही चुकीचं… एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर राजकिय पडसाद

पुण्यातील खराडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टी वर पहाटे ३.३० वाजता पोलिसांनी धाड टाकत या कारवाई केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत हुक्का बारचे साहित्य, त्याचे फ्लेवर, अंमली पदार्थ, चरस गांजा आदी साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्राजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली. याबाबत पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, कोणीही चुकीचं वागायचं नसतं, आणि चुकीचं करायचं नसतं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिस योग्य तपास करत असल्याचे सांगत कोणीही चुकीचं वागायचं नसतं आणि चुकीचं करायचं नसतं असे सूचक वक्तव्य केले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, पुण्यातील रेव्ह पार्टीची जी काही घटना घडली आहे. त्या घटनेचा तपास कायद्याने आणि नियमाने पुणे सीपी अर्थात आयुक्त करत आहेत. जे त्या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *